ZP Election: अहमदनगर (Ahmednagar News) : जिल्हा परिषद (Jilha parishad) आणि पंचायत समिती (panchayt samiti) गट आणि गण आरक्षण जाहीर झाल्याने आता या निवडणुकीकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे. सप्टेंबर महिन्यात दोन्ही पंचायत राज संस्थामध्ये नवे पदाधिकारी आणि सदस्य बसणार असल्याने पुढील वीसेक दिवसात निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. अशावेळी नगर तालुक्यात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले (Ex MLA Shivaji Kardile) यांना पुन्हा एकदा आव्हान देण्यासाठी स्थानिक आघाडी (Mahavikas Aghadi) तयारीत आहे. मात्र, शिवसेना (Shivsena) पक्षाची राज्यस्तरीय फुट आणि राज्यातील भाजपप्रणीत सत्तांतर यामुळे आघाडीत बिघाडी होऊन कर्डिले गटाला यंदा संधी मिळेल असेही म्हटले जात आहे.
Car’s: कार खरेदीची हीच ती संधी; या ठिकाणी मिळत आहे एकापेक्षा एक स्वस्त कार्स https://t.co/6vyALLwXgv
— Krushirang (@krushirang) July 28, 2022
तालुक्यात आणखी एक जिल्हा परिषद गट वाढला आहे. त्यामुळे पंचायत समितीमध्ये सदस्य संख्या दोनने वाढेल. अशावेळी नवनागापूर गट (Navnagapur) हा अनुसूचित जातीच्या महिला यासाठी आरक्षित झाल्याने विद्यमान सदस्य माधवराव लामखडे यांची तर, वडगाव गुप्ता (Vadgaon Gupta) हा गट सर्वसाधारण (ओपन) महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने विद्यमान झेडपी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांची अडचण झालेली आहे. या गटात आता शेळके यांच्या कुटुंबातील कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच वडगाव गुप्ता या गणामधून महिला राखीव येथून लामखडे कुटुंबातील कोण उमेदवारी करते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
Health News : आरोग्य विभागाने ‘या’ 5 जिल्ह्यांसाठी घेतला मोठा निर्णय; वाचा महत्वाची माहिती.. https://t.co/rlafAfaqWS
— Krushirang (@krushirang) July 28, 2022
नागरदेवळे (Nagar Devale) गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने येथून विद्यमान सदस्य शरद झोडगे यांच्या कुटुंबातील महिला आणि माजी आमदार कर्डिले यांचे पुत्र अक्षय यांच्या पत्नी प्रियंका यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. दरेवाडी (Darevadi) गट खुला झाल्याने शिवसेना पक्षाचे सदस्य संदेश कार्ले (Sandesh Karle) यांना लढत देताना दीपक कार्ले किंवा बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांच्यापैकी एकजण रिंगणात असेल असे म्हटले जात आहे. यासह चिचोंडी पाटील (Chichondi Patil) गट येथून माजी झेडपी सभापती महानंदा लांडगे, विद्यमान सभापती सुरेखा गुंड आणि प्रवीण कोकाटे यांच्या पत्नी यांच्यात दुरंगी किंवा तिरंगी लढत होईल अशी चर्चा आहे. वाळकी (Walki) गट पुन्हा एकदा खुला असल्याने बाळासाहेब हराळ यांच्या विरोधात भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले आहे. येथून बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे पाटील किंवा पंचायत समिती सदस्य बंडू कडूस हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
Skin Care Tips: महिला मंडळ फक्त 20 मिनिट घरी युज करा Banana Facial; चेहऱ्यावर दिसणार हा मोठा बदल https://t.co/Z10oX0Lh7d
— Krushirang (@krushirang) July 27, 2022
नगर तालुक्यात शिवसेना, कॉँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) यांच्यात समझोता एक्सप्रेस आहे. माजी आमदार कर्डिले गटापुढे पंचायत समिती आणि झेडपी निवडणुकीत या गटाने सलग विजय मिळवले आहेत. मात्र, यंदा राज्यात शिवसेना पक्षात फुट पडून दोन गट झालेले आहेत. नगर तालुक्यातील शिवसेना अजूनही यामुळे कशी अभेद्य राहणार यावर प्रा. शशिकांत गाडे यांना लक्ष ठेवावे लागणार आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष कर्डिले गटापुढे थेट आव्हान उभे करणार की त्यांच्यात फुट पडणार हेही अजून गुलदस्त्यात आहे. त्याचवेळी कॉँग्रेस पक्षाला तालुक्यात यंदा ठोस चेहरा नाही. अशावेळी एकी ठेऊन कर्डिले गटापुढे आव्हान उभे करून आपली ताकद टिकवण्यात तालुका आघाडीला किती यश येते यावर निवडणुकीचे जय पराजय ठरणार आहेत.
Smartphone: भन्नाट फीचर्ससह 10 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये घरी आणा ‘हा’ दमदार फोन https://t.co/rbefu4ehlI
— Krushirang (@krushirang) July 26, 2022