Zeeshan Siddiqui । काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. झिशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्यात आले, त्यांनंतर सिद्दीकी यांनी आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खूप मोठी खळबळ उडाली आहे.
मागील नांदेडमध्ये ‘भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या जवळच्या व्यक्तीकडून मला राहुल गांधींना भेटायचे असेल तर मला 10 किलो वजन कमी करावे लागेल, असे सांगण्यात आले होते. झीशान सिद्दीदी यांचे काँग्रेसवरील आरोप इथेच संपले नाहीत. पुढे सिद्दीकी म्हणाले की, काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक नेत्यांशी गैरवर्तन करण्यात येत आहे. त्यांनी पक्षावर भेदभावपूर्ण आणि जातीयवादी दृष्टिकोन आहे, असा खळबळजनक आरोप सिद्दीकी यांनी केला आहे.
पुढे सिद्दीकी म्हणाले, “काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक नेते आणि कार्यकर्त्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जात असून ती खूप दुर्दैवी आहे. काँग्रेस आणि मुंबई युवक काँग्रेसमधील जातीयवादाची पातळी इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे. काँग्रेसमध्ये मुस्लिम असणे पाप आहे का? माझ्याकडे पक्ष आहे. मला का लक्ष्य केले जात आहे याचे उत्तर देण्यासाठी? मी मुस्लिम आहे म्हणून असे घडत आहे का?”, असा संतप्त सवाल सिद्दीकी यांनी विचारला आहे.
दरम्यान, बुधवारी झीशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. निवडणुकीत ९० टक्के मते मिळवूनही पक्षाला हा पदभार देण्यासाठी ९ महिने लागले, असा मोठा दावा सिद्दीकी यांनी केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे देखील पक्षात “संपूर्ण स्वातंत्र्याने आपली जबाबदारी पार पाडू शकत नाहीत” असा आरोप झीशान सिद्दीकी यांनी केला आहे.