Yes Bank: शेअर बाजारांसह भारतीय बाजारात पुन्हा एकदा खाजगी बँक Yes Bank चर्चेत आहे. २०२० मध्ये येस बँकेची फसवणूक समोर आल्यावर देशात खळबळ उडाली होती.
मात्र आता पुढील आठवडा या बँकेसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण की येस बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी लॉक-इन कालावधी 6 मार्च 2023 रोजी संपत आहे
मार्च 2020 मध्ये RBI ने येस बँकेचे जुने बोर्ड विसर्जित केले होते आणि बँकेवर पुर्ण ताबा मिळवला होता. त्यांनतर देशातील इतर खाजगी आणि सार्वजनिक बँकांनी एकत्र येत येस बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक योजना तयार केली होती.
एसबीआय येस बँकेतील मोठा शेअर्स होल्डर
येस बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी यांनी येस बँकेत भांडवल गुंतवून संकटातून सावरले होते. बेलआउट योजनेच्या नियमांनुसार, वित्तीय संस्थांना तीन वर्षांसाठी एकूण खरेदी केलेल्या समभागांपैकी 75 टक्के भांडवल धारण करणे आवश्यक होते. किरकोळ गुंतवणूकदारांनाही हा नियम लागू होता.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आता असे वृत्त आहे की लॉक-इन कालावधी संपताच SBI येस बँकेतील आपला हिस्सा कमी करू शकते. येस बँकेतील एसबीआयचा लॉक-इन कालावधी 6 मार्च 2023 रोजी संपत आहे. अहवालानुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेतील आपली हिस्सेदारी टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा विचार करत आहे. तथापि, स्टेक कमी करण्यासाठी, SBI ला RBI ची परवानगी आवश्यक आहे.
येस बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा
एसबीआयचा निर्णय अशा वेळी येण्याची शक्यता आहे जेव्हा येस बँकेची आर्थिक स्थिती गेल्या काही तिमाहींमध्ये सुधारली आहे आणि खाजगी इक्विटी दिग्गज कार्लाइल ग्रुप आणि अॅडव्हेंटने येस बँकेतील 9.99 टक्के हिस्सा घेतला आहे.
2020 मध्ये, SBI ने संकटातून बाहेर पडण्यासाठी येस बँकेतील 49% हिस्सा विकत घेतला होता. परंतु 31 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्स्चेंजमध्ये जाम झालेल्या माहितीनुसार एसबीआयकडे आता येस बँकेत सुमारे 26.14 टक्के हिस्सा आहे. एसबीआय अजूनही येस बँकेतील सर्वात मोठा भागधारक आहे.
येस बँकेचा शेअर घसरला
येस बँकेच्या बेलआउट योजनेनुसार भांडवल ओतण्याच्या तारखेनंतर 3 वर्षांपर्यंत SBI आपला हिस्सा 26 टक्क्यांपेक्षा कमी करू शकत नाही. एसबीआय व्यतिरिक्त, आयसीआयसीआय बँकेची येस बँकेत 2.61 टक्के, अॅक्सिस बँकेची 1.57 टक्के, आयडीएफसी फर्स्ट बँकेची 1 टक्के, एलआयसीची 4.34 टक्के आणि एचडीएफसीची 3.48 टक्के भागीदारी आहे.
या वृत्तानंतर येस बँकेच्या शेअरमध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली, व्यवहाराच्या शेवटी शेअर 4.37 टक्क्यांनी घसरून 17.50 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात, शेअरने 24.75 रुपयांचा उच्चांक गाठला आणि 12.10 रुपयांपर्यंत खाली गेला.