Yamaha Fascino : 49 किमी मायलेजसह खरेदी करता येईल यामाहाची ‘ही’ शानदार स्कुटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Yamaha Fascino : जर तुम्ही नवीन स्कुटर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. तुम्ही आता 49 किमी मायलेजसह यामाहाची शानदार स्कुटर खरेदी करू शकता. या स्कुटरमध्ये उत्तम फीचर्स मिळतील.

मिळेल 5.2 लीटरची इंधन टाकी

हे लक्षात घ्या की यामाहा स्कूटरमध्ये 125cc इंजिन आहे, हे इंजिन 8.2 PS ची पॉवर आणि रस्त्यावर 10.3 Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरमध्ये तरुणांसाठी चार आकर्षक रंगांचे पर्याय दिले आहेत. स्कूटरमध्ये 5.2 लीटरची इंधन टाकी दिली आहे. कंपनीचा असा दावा आहे की स्कूटर 49 kmpl चा उच्च मायलेज देते.

Yamaha Fascino 125 मध्ये एक ॲनालॉग ओडोमीटर असून तो त्याचा लुक वाढवतो. स्कूटरमध्ये सामानासाठी एक साधा हँडलबार आणि 21 लीटर अंडर-सीट स्टोरेज दिले आहे. स्कूटरमध्ये डीआरएल लाईट आणि ॲनालॉग फ्युएल गेज पाहायला मिळेल. भारतीय बाजारात ही स्कूटर TVS Jupiter आणि Hero Maestro Edge 125 सारख्या चांगल्या स्कूटरशी टक्कर देते.

Yamaha Fascino 125 ची फीचर्स

  • स्कूटरमध्ये एलईडी टेल लाईट्स दिले आहेत.
  • स्कूटरचे वजन 99 किलो आहे.
  • यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळेल.
  • सीटची उंची 780 मिमी दिली आहे.
  • स्कूटरचा टायर 12 इंच आहे.
  • यूएसबी चार्जर दिला आहे.

व्हॉइस असिस्ट फीचर

स्कुटरला टक्कर देणाऱ्या TVS ज्युपिटरबद्दल सांगायचे झाल्यास यात 109.7 cc इंजिन दिले आहे. ही उत्कृष्ट स्कूटर 5.1 लीटर इंधन टाकीसह खरेदी करता येईल. यात अलॉय व्हील्स आणि 12 इंच टायरचा आकार असून या शानदार स्कूटरमध्ये व्हॉइस असिस्ट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखी प्रगत फीचर्स आहेत.

Leave a Comment