Yakuza Karishma Electric Car: सध्या भारतीय ऑटो बाजारात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी कार पेक्षाही जास्त इलेक्ट्रिक कार्सला मागणी वाढत चालली आहे.
दर महिन्याला इलेक्ट्रिस कार्सच्या विक्रीत बंपर वाढ होताना दिसत आहे. यामुळे सध्या अनेक ऑटो कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किमतीमध्ये जास्त रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करत आहे.
यातच जर तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असाल तर आता भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या, याकुजा करिश्मा ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च होणार आहे.ज्याची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते.
याकुजा करिश्माची निर्मिती हरियाणातील सिरसा येथील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी करत आहे. ही कार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचे बोलले जात आहे. या इलेक्ट्रिक कार ची किंमत 1.70 लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून मिळाली आहे.
फीचर्स जाणुन घ्या
यामध्ये तुम्हाला बसण्यासाठी 3 जागा मिळतील तर त्याची खास डिजाइन आणि लूक खूपच आकर्षक दिसू शकेल. या ईव्ही कारमध्ये तुम्हाला एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फॉग लॅम्प, ब्रॉड ग्रिल, क्रोम डोअर हँडल, कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प, पॉवर विंडो, बॉटल होल्डर यांसारखी फीचर्स पाहायला मिळतील. याशिवाय, या ईव्ही कारमध्ये तुम्हाला स्पीकर, ब्लोअर, पुश स्टार्ट/स्टॉप बटण, सनरूफ, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले देखील देण्यात आले आहेत.
बॅटरी आणि रेंज
याकुझा ईव्ही कारमध्ये, तुम्हाला 60v42ah बॅटरी देण्यात आली आहे, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तुम्हाला 50-60 किलोमीटरची रेंज देते. ही कार पूर्णपणे चार्ज होण्यासाठी तुम्हाला 6-7 तास लागतात. ही EV कार चार्ज करण्यासाठी, तुम्हाला टाइप 2 चार्जर मिळेल. मात्र त्याची डिलिव्हरी अद्याप सुरू झालेली नाही.
बाईकपेक्षा ईव्ही कार स्वस्त
Hero Karizma XMR ची भारतात एक्स-शोरूम किंमत 1.79 लाख रुपयांपासून सुरू होते. अशाप्रकारे याकुजा करिश्माची किंमत बाईकपेक्षा कमी असल्याचे तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला Yakuza EV च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ती बुक करावी लागेल. जेव्हा ही EV कार बाजारात येईल तेव्हा लोकांना स्वस्त EV कार खरेदी करण्याची चांगली संधी मिळेल.