Xiaomi 12 Pro: तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सध्या बाजारात एका लोकप्रिय स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
तुम्ही या संधीचा फायदा घेत अगदी स्वस्तात तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. हे जाणुन घ्या की Xiaomi 12 Pro या स्मार्टफोनवर एक बंपर डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.
या फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेल कॅमेरा मिळत आहे आणि 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज दिले जात आहे. बँकेच्या सर्व ऑफर्समुळे फोन आता स्वस्त झाला आहे.
या फ्लॅगशिप फोनची किंमत दुसऱ्यांदा कमी करण्यात आली आहे. जी किंमत प्रथमच कमी करण्यात आली होती ती 10 हजार होती. यावेळी 4000 रुपये आणखी कमी केले आहेत, परंतु ही ऑफर कशी मिळवायची हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जुना फोन दिल्यावर तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळेल.
Xiaomi 12 Pro ऑफर
स्मार्टफोन 8GB RAM + 128GB अंतर्गत स्टोरेज व्हेरिएंट पूर्वी 52,999 रुपयांना उपलब्ध होता, जो 44,999 रुपयांना स्वस्त मिळत आहे. फोनचा 12GB RAM + 256GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट आधी 56,999 रुपयांना उपलब्ध होता, आता त्याची किंमत 48,999 रुपयांवर आली आहे.
तुम्हाला बँकेच्या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे ICICI बँक, HDFC बँक, SBI बँक आणि Axis Bank बँक यांचे क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. फोनच्या खरेदीवर ग्राहकांना 2000 रुपयांची सूटही मिळू शकते.
एक्सचेंज ऑफरवर अतिरिक्त सवलत देखील आहे. एक्सचेंज केलेल्या फोनच्या मूळ किमतीवर 2000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. सर्व सवलतींसह, तुम्हाला हा फोन 14,000 रुपयांनी स्वस्त मिळेल.
यामध्ये तुम्हाला 4,600mAh ची पॉवरफुल बॅटरी मिळत आहे जी जास्त काळ टिकेल. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, बॅक कॅमेरा 50 मेगापिक्सेल + 50 मेगापिक्सेल + 50 मेगापिक्सेल आहे, तर फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सेल आहे.