Xiaomi 14 । प्रतीक्षा संपली! लवकरच लाँच होणार जबरदस्त फीचर्स आणि तीन 50MP कॅमेरे असणारा Xiaomi चा फोन

Xiaomi 14 । जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेणार असाल तर जरा थांबा. कारण बाजारात Xiaomi चा नवीन जबरदस्त स्मार्टफोन लाँच होणार आहे. कंपनीचा हा फोन लाँच झाल्यानंतर इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनला देईल. हा तुमच्यासाठी उत्तम फोन असेल. यात कंपनीकडून 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि UFS 4.0 स्टोरेज देण्यात आले आहे.

Xiaomi India कडून पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात Xiaomi 14 लॉन्च करण्याची पुष्टी करण्यात आली आहे. नवीन टीझरमध्ये असे दिसून आले आहे की नवीन लाइनअपचे फक्त व्हॅनिला मॉडेल भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर भारतीय बाजारपेठेत Xiaomi 14 Ultra आणि Xiaomi 14 Pro लाँच करण्याची पुष्टी झाली नाही. या फोनच्या कॅमेरा सेटअपसाठी ब्रँडने Leica सोबत भागीदारी केली आहे.

जाणून घ्या Xiaomi 14 ची वैशिष्ट्ये

हा स्मार्टफोन मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनी बाजारात आला होता, ज्याच्या वैशिष्ट्यांबद्दल आधीच माहिती आहे. कंपनीच्या या नवीन फोनमध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.36-इंचाचा LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. स्टोरेजचा विचार केला तर या डिव्हाइसमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि UFS 4.0 स्टोरेज मिळेल.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर Leica सह भागीदारीत Xiaomi 14 मध्ये सेन्सर OIS आणि Summilux लेन्ससह 50MP प्राथमिक सेन्सर देण्यात येणार आहे. याशिवाय, सेटअपमध्ये 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आहे. फोन IP68 रेटिंगसह येतो आणि त्याची 4,610mAh बॅटरी 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगसह समर्थित आहे.

Leave a Comment