Xiaomi 14 Civi : पुढच्या महिन्यात येतोय Xiaomi चा हा अप्रतिम, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Xiaomi 14 Civi : स्मार्टफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. Xiaomi Sivi 4 चा हा अप्रतिम फोन पुढच्या महिन्यात लाँच होणार आहे. याचा फ्रंट आणि रियर कॅमेरा अप्रतिम आहे. जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन . हा फोन चीनमध्ये मार्चमध्ये लॉन्च केलेली Xiaomi Sivi 4 Pro ची रीब्रँडेड आवृत्ती असेल.

Xiaomi Sivi 4 Pro चे फीचर्स

कंपनी या फोनमध्ये 2750×1236 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.55-इंच 1.5K 12-बिट OLED डिस्प्ले देत असून त्याचा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश दर आणि 240Hz च्या टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करणाऱ्या या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस पातळी 3000 nits इतकी दिली आहे. या फोनच्या डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी या फोनमध्ये Gorilla Glass Victus 2 देत आहे.

रॅम आणि स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 16 GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 512 GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह येतो, प्रोसेसर म्हणून कंपनी फोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 चिपसेट देत असून फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत.

यात 50-मेगापिक्सेल लीका सममिलक्स मुख्य लेन्ससह 50-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि 12-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड अँगल लेन्सचा समावेश करण्यात आला आहे. या फोनमध्ये दिलेला मुख्य कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो.

इतकेच नाही तर कंपनी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनमध्ये 4700mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 67 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Xiaomi HyperOS वर काम करणाऱ्या या फोनमध्ये बायोमेट्रिक सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. तर या फोनमध्ये 5G SA/NSA, Dual 4G VoLTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, NFC, इन्फ्रारेड सेन्सर आणि USB Type-C 3.2 Gen 1 सारखे पर्याय मिळतील.

Leave a Comment