Passport : जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट यादी (Passport List) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय पासपोर्ट 87 व्या क्रमांकावर आहे. यामध्ये काही अंकांची घसरण दिसत आहे. कारण, याआधी भारतीय पासपोर्ट 83 व्या क्रमांकावर होता. आता मात्र 87 क्रमांकावर असल्याचे या यादीद्वारे स्पष्ट होत आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्स संस्था जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर करते. त्यात एकूण 199 देशांच्या पासपोर्टचा समावेश आहे. सन 2021 मध्ये भारतीय पासपोर्ट (Indian Passport) 199 देशांच्या क्रमवारीत 90 व्या क्रमांकावर होता, परंतु 2022 मध्ये भारतीय पासपोर्ट 7 क्रमांकांनी झेप घेत 83 व्या क्रमांकावर पोहोचला होता. त्यानंतर संस्थेने प्रकाशित केलेल्या यादीत भारतीय पासपोर्ट 87 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Biogas subsidy scheme: गोबरगॅस अनुदानासाठी ‘तिथे’ करा संपर्क; व्हा आत्मनिर्भर https://t.co/yII1p1E5q5
— Krushirang (@krushirang) July 21, 2022
भारतीय पासपोर्टच्या या अधिकाराचा फायदा भारतीय पासपोर्ट असलेल्या सर्व भारतीयांना मिळणार आहे. आता भारतीय पासपोर्टधारक व्हिसाशिवाय (Visa) जगातील 60 देशांमध्ये सहज जाऊ शकतात. गेल्या वर्षापर्यंत एकूण 58 देशांना भारतीय पासपोर्टद्वारे व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी होती.
इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) ने जारी केलेल्या डेटाचा विचार करून हेन्ली पासपोर्ट इंडेक्स जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर करते. कोणत्याही देशाच्या पासपोर्टची ताकद त्या देशाच्या पासपोर्टच्या मदतीने व्हिसाशिवाय किती देशात प्रवास करता येईल यावर अवलंबून असते. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या क्रमवारीत दहा देश आघाडीवर आहेत. यामध्ये सिंगापूर, जपान, जर्मनी, दक्षिण कोरिया, इटली, लेक्जेंबर्ग, स्पेन, ऑस्ट्रिया या देशांचा समावेश आहे.
Amazon Prime Day 2022: अरे वा.. ऑफर्सचा पडणार पाऊस; ‘या’ वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काउंट https://t.co/ELGPbZdgag
— Krushirang (@krushirang) July 21, 2022
भारतीय पासपोर्टच्या मदतीने 60 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करता येतो. तर आपल्या शेजारी देश पाकिस्तानच्या (Pakistan) पासपोर्टने फक्त 31 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करता येतो. या क्रमवारीत अफगाणिस्तान (Afghanistan) आता खूप मागे पडला आहे. अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीमुळे त्याचा पासपोर्टही पूर्णपणे कमकुवत झाला आहे.