World’s Most Polluted City | जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर भारतात, नाव ऐकून बसेल धक्का!

World’s Most Polluted City | जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांचा विचार केला तर विकसित देशांनाही (World’s Most Polluted City)आशिया खंडातील देशांनी मागे टाकले आहे. चीन, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत या देशांतील शहरे सर्वाधिक प्रदूषित (Most Polluted Cities) म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. स्वित्झर्लंडमधील आयक्यू एअर संस्थेने (IQAir) वायू गुणवत्ता रिपोर्ट 2023 जाहीर केला आहे. बिहार राज्यातील बेगुसराय सर्वात (Begusarai) प्रदूषित महानगरांमध्ये आघाडीवर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या शहरातील हवा श्वास घेण्यासाठी योग्य राहिलेली नाही.

बेगुसराय शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स 400 पार गेला आहे. शहरात किती प्रदूषण आहे (Air Pollution) याची माहिती काही दिवसांपासून दिली जात नाही. त्यामुळे सद्यस्थितीतील प्रदूषण किती आहे याची माहिती मिळालेली नाही. रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना श्वास घेणे सुद्धा अतिशय कठीण झाले आहे. स्थानिक प्रशासनाने काही दिवसांपूर्वी शहरातील प्रदूषणाचे आकडे जाहीर केले होते. त्यानंतर धुळीचा त्रास कमी करण्यासाठी रस्त्यांवर पाणी मारले होते. पण हा प्रयोग फार दिवस टिकला नाही. भरधाव वेगातील वाहनांमुळे उडणारी धूळ नाकात जाऊ नये यासाठी लोक मास्कचा वापर करू लागले आहेत. धूळ उडू नये म्हणून रस्त्यांवर पाणी मारले जात आहे, परंतु यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे.

World’s Most Polluted City

Water Crisis in World : फक्त बंगळुरू नाही, तर जगातील ‘या’ शहरांतही पाण्याचा दुष्काळ, वाचा माहिती..

प्रदूषणाचे नुकसान काय?

वाढते प्रदूषण आणि हवेत धुलिकणांचे (Air Quality Index) प्रमाण वाढल्याने कॅन्सर, मधुमेह, दमा, फुफ्फुसांचा आजार यांसारख्या समस्या उद्भवत आहेत. प्रदूषणाची उच्च पातळी PM 2.5 च्या संपर्कात आल्याने मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. प्रदूषणाची ही परिस्थिती डोळ्यांसाठी सुद्धा घातक आहे. दमा असलेल्या रुग्णांना या प्रदूषणाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

कसे सुरक्षित राहाल?

प्रदूषणाच्या त्रासापासून वाचण्यासाठी स्वतः फिट राहा. सकाळी लवकर उठून व्यायाम किंवा जॉगिंग करा. घरातून बाहेर पडण्यापूर्वी चांगल्या दर्जाचा मास्क वापरा. आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. इम्यूनिटी बूस्टर फळे आणि भाजीपाल्याचा आहारात समावेश करावा.

Coconut water । उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी नारळ पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

भारतातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक 

वायू गुणवत्ता अहवालात 134 देशांची यादी आहे. या यादीत बांग्लादेश, पाकिस्तान नंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सन 2022 मध्ये या यादीत भारताचा आठवा क्रमांक होता. आता मात्र देशातील प्रदुषणाची परिस्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे. अहवालानुसार, आताच्या या यादीत आफ्रिकेतील सात नव्या देशांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बुर्किना फासो हा जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदुषित देश आहे.

Leave a Comment