World’s Most Polluted Cities : देशात प्रदूषणाची समस्या वेगाने वाढत (World’s Most Polluted Cities) चालली आहे. दिल्ली सरकार मागील 9 वर्षात प्रदूषण 30 टक्के कमी झाल्याचा दावा करत असले तरी अजूनही दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी एक आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित असणाऱ्या 20 शहारांमध्ये दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे. तर नवी दिल्ली नवव्या क्रमांकावर आहे. ग्रेटर नोएडा, फरीदाबाद, गाझियाबाद यांसह एनसीआरचे सहा शहरे टॉप 20 यादीत समाविष्ट आहेत.
जगातील सर्वाधिक 20 प्रदूषित शहरांत एकट्या भारतातील 14 शहरे आहेत. बाकी सहा शहरांमध्ये तीन शहरे पाकिस्तानातील आहेत. पाकिस्तानचे लाहोर शहर जास्त प्रदूषित आहे. जगभरात वायू प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. दिल्ली आणि एनसीआरमधील शहरांत दरवर्षी हिवाळ्यात काही दिवस श्वास घेणेही कठीण होते इतके प्रदूषण वाढते.
आताच एक अहवाल आला आहे ज्यावरून भारतातील वायू प्रदूषणाची गंभीरता लक्षात येते. अहवालानुसार, जगातील वीस सर्वाधिक प्रदूषित शहरात 14 शहरे भारतातील आहेत तर 3 शहरे पाकिस्तानातील आहेत. म्हणजेच दक्षिण आशियातील या दोन देशांतच 17 शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत.
स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी आयक्यू एअरच्या अहवालानुसार जगभरात सर्वाधिक प्रदूषित शहर पाकिस्तानातील लाहोर आहे. जगभरातील प्रदूषित देशांचा विचार केला तर या यादीत भारत आठव्या क्रमांकावर आहे. पहिल्या पाच देशांमध्ये चाड, इराक, पाकिस्तान, बहरीन, बांग्लादेश अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.
चाड देशातील एनजामेना शहर जगातील आठव्या क्रमांकाचे प्रदूषित शहर आहे. चीनचे होतन शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील भिवंडी शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये चाड, इराक, पाकिस्तान, बहरीन आणि बांग्लादेश या पाच सर्वाधिक प्रदूषित देशांसह भारत आठव्या क्रमांकावर होता.
20 प्रदूषित शहरांची यादी
वीस सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत लाहोर (पाकिस्तान), होतन (चीन), भिवंडी (भारत), दिल्ली (भारत), पेशावर (पाकिस्तान), दरभंगा (भारत), असोपूर (भारत), एनजामेना (चाड), नवी दिल्ली (भारत), पटना (भारत), गाझियाबाद (भारत), धौरहरा (भारत), बगदाद (इराक), छपरा (भारत), मुजफ्फरनगर (भारत), फैसलाबाद (पाकिस्तान), ग्रेटर नोएडा (भारत), बहादूरगढ (भारत), फरीदाबाद (भारत), मुजफ्फरपूर (भारत).