World’s most Happy Country : जगात सर्वात आनंदी देश कोणता? अमेरिका नाही, ‘हा’ देश सर्वात हॅपी!

World’s most Happy Country : जगातील सर्वाधिक आनंदी देश कोणता असा प्रश्न विचारला तर अनेकांच्या डोळ्यांसमोर अमेरिकेचं नाव येतं. पण, थांबा अमेरिका हा सर्वात आनंदी देश नाही. नुकतीच जगातील सर्वाधिक आनंदी देशांची यादी जाहीर झाली आहे. या आनंदी देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका, चीन, रशिया नाही तर फिनलँड नावाचा लहान देश आहे. संयुक्त राष्ट्रांचा जागतिक वार्षिक आनंदी अहवाल (United Nations Report) आज जाहीर करण्यात आला. फिनलँड हा सलग (Finland) सातव्या वर्षी जगातील सर्वाधिक आनंदी देश ठरला आहे. या यादीत भारत मागील वर्षाप्रमाणेच यावेळी सुद्धा 126 व्या क्रमांकावर कायम आहे. या यादीत फिनलँड नंतर डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडन या देशांचा नंबर लागतो.

या यादीत तालिबानी राजवट असलेला अफगाणिस्तान सर्वात खाली आहे. अहवाल जाहीर होत असल्यापासून मागील दशकभराच्या काळात अमेरिका, जर्मनी हे देश पहिल्या वीस देशांच्या यादीत कायम होते. परंतु आता मात्र अमेरिका 23 आणि जर्मनी 24 व्या क्रमांकावर ढकलला गेला आहे. कोस्टा रिका 12 व्या आणि कुवैत 13 व्या क्रमांकावर राहिला आहे. या दोन्ही देशांनी आता टॉप 20 यादीत स्थान मिळवले आहे.

World’s most Happy Country

Russia President Election : रशियातही निवडणुकांची धामधूम; मतदान सुरू, कोण होणार राष्ट्राध्यक्ष?

जगातील कोणताही मोठा देश आता आनंदी देशांच्या यादीत नाही. टॉप 10 देशांच्या यादीत आता फक्त नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलिया हे दोनच देश असे आहेत ज्यांची लोकसंख्या 15 मिलियन पेक्षा जास्त आहे. टॉप 20 देशांच्या यादीत कॅनडा आणि ब्रिटन हे दोन देश असे आहेत ज्यांची लोकसंख्या 30 मिलियन पेक्षा जास्त आहे. सन 2006-10 नंतर आनंदी देशांच्या यादीत अफगाणिस्तान, लेबनॉन आणि जॉर्डन या देशांची कामगिरी कमालीची खराब राहिली आहे. तर सर्बिया, बल्गेरिया, लाटविया या देशांच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.

ही यादी तयार करताना व्यक्तीच्या जीवनातील समाधानाचे आत्म मूल्यांकन तसेच जीडीपी, निरोगी आयुर्मान, स्वातंत्र्य, औदार्य, भ्रष्टाचार या निकषांचा अभ्यास केला जातो. फिनलँडमधील हेलसिंकी विद्यापीठातील प्राध्यापक जेनिफर डी पाओला यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले की फिनलंडमध्ये राहणाऱ्या लोकांचे निसर्गाशी घनिष्ठ संबंध आहेत.

World’s most Happy Country

TikTok Ban in America : चीनला दणका! ‘TikTok’बाबत अमेरिका ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

Leave a Comment