Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनला कोरोनाचा ताप..! रुग्ण वाढल्याने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या, कोरोना अपडेट..

दिल्ली – चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 275 नवीन कोविड बाधित रुग्ण (New Corona Patient In China) सापडले आहेत. त्यापैकी 134 लक्षणे नसलेले आणि 141 लक्षणे असलेले रुग्ण होते. एक दिवस आधी 210 प्रकरणे आढळून आली होती.

Advertisement

बीजिंगमधील सॅनलिटुन भागातील एका सुपरमार्केटमधून पसरलेल्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तीन कोविड चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलच्या उत्तरार्धात बीजिंगमध्ये कोविडची प्रकरणे कमी झाल्याने नियम हळूहळू शिथिल केले जात होते. झिरो कोविड धोरण (Zero Covid Policy) अजूनही सुरू आहे, ज्या अंतर्गत या वेळेपासून संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत.

Advertisement

सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, इशारा जारी होताच बीजिंगच्या दोन जिल्ह्यांत कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. चीन सरकारच्या आकडेवारीनुसार, 140 कोटी लोकसंख्येच्या देशात कोरोनामुळे केवळ 5,226 मृत्यू झाले आहेत. मात्र, चीनच्या या आकडेवारीवर अमेरिकेसह अनेक देशांनीही शंका व्यक्त केली आहे. अनेक परदेशी मीडिया रिपोर्ट्समध्ये चीनमध्ये कोरोनामुळे  (Corona In China) उद्भवलेल्या संकटाचा खुलासाही करण्यात आला आहे. चीनने कोरोनाबाबत जगाला सत्य काय आहे ते कळू दिले नाही. त्यामुळे या देशातील कोरोना परिस्थितीबाबत नेहमीच संभ्रमाची परिस्थिती असते.

Loading...
Advertisement

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतातील (India) काही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे संबंधित राज्य सरकारे आणि केंद्र सरकार सतर्क झाले आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीकरणावर (Vaccinaton) भर देण्यात येत आहे. तसेच नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Advertisement

सावधान देशात पुन्हा वाढत आहे कोरोना; दिवसभरात इतक्या रुग्णांची नोंद

Advertisement

अमेरिका आणि चीन कोरोनाने हैराण..! चीनमध्ये आणखी एका शहरात कठोर लॉकडाऊन; जाणून घ्या अपडेट

Advertisement
Advertisement

Leave a Reply