Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : युक्रेनच्या अध्यक्षांनी जगाला दिला ‘हा’ धोक्याचा इशारा; जाणून घ्या..

दिल्ली – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी जगाला रशियन हमले थांबविण्याचे आवाहन केले. रशियन हमल्याचा केवळ युक्रेनवरच (Ukraine) परिणाम होत नसून संपूर्ण जगावर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचाही आगामी काळात गंभीर परिणाम होणार आहे. युक्रेनवरील या हमल्यामुळे जगाची व्यवस्था बिघडणार असल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले. सिंगापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी जगाला हा इशारा दिला.

Advertisement

झेलेन्स्की म्हणाले, की 100 दिवसांच्या लढाईत युक्रेनला (Russia Ukraine War) ज्या प्रकारे साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत. काळा समुद्र आणि आणखी एका समुद्रावर रशियाचा ताबा केवळ युक्रेनवरच नाही तर संपूर्ण जगाला प्रभावित करत आहे, असे ते म्हणाले. यामुळे जागतिक बाजारपेठेत पोहोचणारा गहू, मका आणि इतर अन्नधान्यांचा पुरवठा (Supply Of Wheat) थांबला आहे. याचा फटका अन्नसंकट (Food Crisis) आणि वाढत्या महागाईच्या (Inflation) स्वरूपात येऊ शकतो. त्यामुळे गुन्हेगारी वाढून अस्थिरता निर्माण होऊ शकते. झेलेन्स्की म्हणाले, की त्यांच्या सैन्याला रशियन भूमीवर युद्ध करण्याची अजिबात इच्छा नाही. युक्रेनियन सैन्य आपली जमीन आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी लढत आहे. यात त्याला संपूर्ण जगाचे सहकार्य आणि सदिच्छा अपेक्षित आहे.

Advertisement

युक्रेनचे संकट वेळीच सोडवले नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेवर (Effect On World Economy) परिणाम होईल, असा इशाराही नुकताच जागतिक बँकेने (World Bank) जगाला दिला होता. जागतिक बँकेचे अध्यक्षांनी सांगितले की, या युद्धाचे परिणाम दिसू लागले आहेत, जगाच्या अनेक भागांमध्ये अन्न पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने त्याच्या किमती प्रचंड वाढताना दिसत आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, या दोन्ही देशांतील युद्ध अजूनही मिटलेले नाही. या युद्धामुळे रशिया आणि युक्रेनच नाही तर जगाचेही मोठे नुकसान झाले. अनेक गरीब आणि विकसनशील देशांना याचा मोठा फटका बसला आहे. युद्ध थांबविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. जागतिक पातळीवर या युद्धाचे परिणाम आता स्पष्टपणे दिसत आहेत.

Advertisement

रशियाचा ‘असा’ ही कारनामा..! युक्रेनच्या कोट्यावधींच्या गव्हाबाबत घडलाय ‘हा’ धक्कादायक प्रकार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply