Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

एलोन मस्क ने घेतला मोठा निर्णय; अनेकांच्या अडचणीत होणार वाढ; चर्चांना उधाण

नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीच्या टेस्ला (Tesla) येथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी काढून टाकू शकतात. मस्क यांनी यासंदर्भात निवेदन दिले असून ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेबद्दल खूप वाईट भावना आहे आणि टेस्लाने आपल्या 10 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकावे. गुरुवारी त्याच्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये, टेस्लाचे सीईओ मस्क म्हणाले की, इलेक्ट्रिक कार कंपनीने अर्थव्यवस्थेबद्दल “अत्यंत गडद भावना” असल्यामुळे 10 टक्के कर्मचारी काढून टाकले पाहिजेत.

Advertisement

कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाठवला मेल
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मस्कने त्यांच्या अधिकाऱ्यांना एक अंतर्गत मेल पाठवला आहे, ज्यामध्ये अर्थव्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या मेलचे शीर्षक होते ‘कर्मचाऱ्यांची भरती थांबवा’. या ईमेलच्या आधी, टेस्लाने जगभरातील विविध शहरांमध्ये सुमारे 5,000 नोकऱ्या काढून टाकल्या होत्या, ज्यावर सध्या भरती थांबवण्यात आली आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

वर्क फ्रॉम होम
या आठवड्याच्या सुरुवातीला सर्व कर्मचाऱ्यांना मस्कने कार्यालयात येण्याचे आदेश दिले होते. मस्क यांनी कर्मचाऱ्यांना एकतर नोकरी सोडण्यास किंवा कार्यालयात येऊन आठवड्यातून 40 तास काम करण्यास सांगितले होते. एखादा कर्मचारी कार्यालयात आला नाही, तर त्याने राजीनामा दिला आहे, असे मानले जाईल.

Loading...
Advertisement

अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता
जगात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे अमेरिका, भारत आणि जपानसारख्या तेल आयात करणाऱ्या देशांची अर्थव्यवस्था मंदावू शकते, त्यामुळे मागणीतही घट होण्याची शक्यता आहे.

Advertisement

अमेरिकेतील महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर

Advertisement

अमेरिकेतील महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे, ज्यामुळे अमेरिकन लोकांना त्यांच्या गरजेच्या गोष्टींवर जास्त खर्च करावा लागत आहे. अशा स्थितीत टेस्लासारख्या उच्च वाढीच्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनाची मागणी कमी होण्याची भीती आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply