Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाबो.. युद्धादरम्यान रशियाने घेतला धक्कादायक निर्णय; ‘या’ दोन देशांवर केली मोठी कारवाई

दिल्ली –  रशिया आणि युक्रेनमधील (Russia And Ukraine) रक्तरंजित युद्धाला 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. असे असूनही, कोणतीही बाजू आपल्या खुल्या विजयाचा दावा करण्याच्या स्थितीत नाही. दरम्यान, पाश्चात्य देश रशियावर सातत्याने नवनवीन निर्बंध लादत आहेत.आता रशियानेही पाश्चिमात्य देशांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

जर्मनी आणि डेन्मार्कला गॅस पुरवठा बंद
रशियाने जर्मनी (Germany) आणि डेन्मार्कचा (Denmark) गॅस पुरवठा बंद केला आहे. रशियन गॅस कंपनी गॅझप्रॉमने सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता डॅनिश ऊर्जा कंपनी ऑरस्टेडला गॅसचा पुरवठा थांबवत आहे. यासोबतच जर्मनीची शेल एनर्जी कंपनीही गॅस वितरण बंद करत आहे. रशियन कंपनीने सांगितले की, जोपर्यंत या देशांसोबतचा पेमेंट वाद सोडवला जात नाही तोपर्यंत गॅस पुरवठा सुरू केला जाणार नाही.

Advertisement

रुबल न भरल्याबद्दल निर्णय घेतला
यापूर्वी, जर्मन आणि डॅनिश दोन्ही कंपन्यांनी रशियन कंपनी गॅझप्रॉमला टेलिग्रामद्वारे संदेश पाठवले होते की ते रूबलमध्ये पेमेंट करणे सुरू ठेवू शकणार नाहीत. यानंतर रशियन कंपनीने दोघांवर कारवाई करत त्यांचा पुरवठा बंद केला. बुधवारपासून हा पुरवठा थांबणार असल्याचे रशियन कंपनीने सांगितले.

Loading...
Advertisement

पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत
अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चिमात्य देशांनी रशियाविरुद्ध डॉलरच्या व्यापारावर बंदी घातली आहे. रशियाने आपल्या चलनात कपात करून इतर देशांशी रुबलमध्ये व्यापार सुरू केला. जर्मनी आणि डेन्मार्कने मंगळवारी स्पष्ट केले की ते यापुढे गॅससाठी रुबलमध्ये पैसे देऊ शकणार नाहीत. यानंतर रशियाने या देशांना होणारा गॅस पुरवठा बंद केला.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

पुतीन यांनी 31 मार्च रोजी या आदेशावर स्वाक्षरी केली
या पाश्चिमात्य विरोधी वर्तनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 31 मार्च रोजी गैर-मित्र देशांबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्या देशांनी रुबलमध्ये पैसे देण्यास नकार दिल्यास त्यांच्यासोबतचे करार थांबवता येतील, असे या आदेशात म्हटले होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply