Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ प्रकरणात ऑस्ट्रेलियाने दिला चीनला दणका; अनेक चर्चांना उधाण; जाणुन घ्या संपूर्ण प्रकरण

दिल्ली –   ऑस्ट्रेलिया (Australia), अमेरिकेला ( America)  घेरण्यासाठी प्रशांत महासागरातील 10 देशांसोबत सुरक्षा करार करण्याच्या चीनच्या (China) प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. पॅसिफिक देशांच्या दौऱ्यावर गेलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पॅसिफिक देशांनी चीनसोबत व्यापार आणि सुरक्षा करार करण्यास नकार दिला. वांग यी यांनी फिजीमध्ये 10 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेतली परंतु चीनसोबत सुरक्षा आणि आर्थिक करारावर कोणताही करार होऊ शकला नाही.

Advertisement

चीन या 10 देशांसोबत मुक्त व्यापार, पोलीस सहकार्य आणि आपत्ती बाबत सर्वसमावेशक करार करू पाहत होता. फिजीचे पंतप्रधान फ्रँक बैनीमारामा म्हणाले की, पॅसिफिक देश त्यांच्या वृत्तीत एकजूट आहेत. ते म्हणाले की, नेहमीप्रमाणेच नवीन प्रादेशिक करारावर आम्ही आमच्या 10 देशांमध्ये परस्पर संवादाद्वारे एकमत निर्माण करू. फिजीच्या पंतप्रधानांनी असेही सांगितले की त्यांना हवामान बदल आणि उत्सर्जन कमी करण्याबाबत चीनसोबत ठोस वचनबद्धता हवी आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी दिले सुरक्षा करारावर स्पष्टीकरण
दरम्यान, फिजीमधील चीनचे राजदूत कियान बो म्हणाले की, काही पॅसिफिक देशांनी बीजिंगच्या सर्वसमावेशक प्रस्तावांच्या काही घटकांवर आक्षेप घेतला होता. ते म्हणाले, ‘ज्या 10 देशांशी आमचे राजनैतिक संबंध आहेत त्यांना समान पाठिंबा आहे. पण अर्थातच काही विशिष्ट मुद्द्यांवर काही चिंता आहेत.” आम्ही लवकरच आमची भूमिका स्पष्ट करू असे चीनच्या राजदूताने सांगितले. ते म्हणाले की आम्ही आमच्या मित्रांच्या सतत संपर्कात असतो.

Advertisement

चीनच्या राजदूताने असा दावा केला की, आपल्या देशाचे धोरण आहे की आम्ही कोणत्याही देशावर काहीही लादत नाही. असे कधीच झाले नाही. ते म्हणाले की, आम्ही फिजीसोबत तीन करार केले आहेत, ते सर्व आर्थिक विकासाबाबत आहेत.

Advertisement

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, आम्ही कोणत्याही राजकीय अटीशिवाय प्रशांत महासागरातील देशांना मदत देत राहू. ते म्हणाले की, चीन हा पॅसिफिक देशांचा दीर्घकालीन मित्र आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री काहीही दावा करत असले तरी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया याकडे आपला वेढा म्हणून पाहत होते. क्वाड आणि ओकसला प्रत्युत्तर म्हणून चीन ते बनवत असल्याचे मानले जाते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply