Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अमेरिकेला झटका..! युरोपातील ‘या’ लहान देशाने रशियाबरोबर केला मोठा करार; वाचा, महत्वाची माहिती..

दिल्ली – युरोपियन युनियन आणि अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा विचार न करता सर्बियाने (Serbia) रविवारी रशियाबरोबर मोठ्या गॅस करारावर स्वाक्षरी केली. त्यांच्या या निर्णयाचे वर्णन मोठे पाऊल आणि रशियाच्या हितासाठी घेतलेला निर्णय असे केले जात आहे. सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांनी याआधी युक्रेनवरील (Russia Ukraine War) हमल्याचा निषेध करण्यासह युरोपीय देशांनी रशियावर लादलेले निर्बंध स्वीकारण्यास नकार दिला होता.

Advertisement

सर्बिया आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे रशियावर अवलंबून आहे. त्याच्या प्रमुख ऊर्जा कंपन्या देखील रशियाच्या मालकीच्या आहेत. वुसिक हे रशियाचे समर्थक मानले जातात. त्यांनी अलीकडेच सांगितले की युरोपियन युनियनची (European Union) इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या संघटनेत सामील व्हावे, परंतु अलिकडच्या वर्षांत, सर्बियाचे रशियाशी (Russia) संबंध दृढ झाले आहेत आणि आम्ही दीर्घकाळचे मित्र आहोत.

Advertisement

पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले की, या करारातील मूलभूत घटकांवर आम्ही सहमती दर्शवली आहे, जे सर्बियासाठी उपयुक्त आहेत. हा करार (Deal) तीन वर्षांसाठी आहे. पुतिन (Vladimir Putin) यांच्याबरोबर फोनवरील संभाषणात त्यांनी या प्रदेशात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन केले असल्याचे त्यांनी सांगितले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या जूनच्या सुरुवातीला बेलग्रेडच्या भेटीदरम्यान या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

दरम्यान, युक्रेन युद्धाने आता चौथ्या महिन्यात (Russia Ukraine War) प्रवेश केला आहे. रशियाला एकाकी पाडण्याचे पाश्चात्य देशांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पश्चिमेला इशारा दिला, की असे प्रयत्न करणारे स्वत:चेच नुकसान करून घेतील. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, की रशियाला वेगळे (Isolate) करणे अशक्य आहे. युद्धामुळे जागतिक अन्न आणि इंधन पुरवठा गंभीरपणे प्रभावित झाला आहे. मात्र, पुतिनचे धोरण बदलण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Loading...
Advertisement

पुतीन गुरुवारी युरेशियन इकॉनॉमिक फोरमच्या सदस्यांबरोबर संवाद साधत होते. ज्यामध्ये अनेक माजी सोव्हिएत राष्ट्रांचा समावेश आहे. ते म्हणाले की आधुनिक जगात हे अशक्य, पूर्णपणे अवास्तव आहे. रशियन अध्यक्षांनी महागाई, वाढती बेरोजगारी, पुरवठा साखळी तुटणे आणि अन्नासारख्या संवेदनशील क्षेत्रातील जागतिक संकटाची तीव्रता यावरही मत व्यक्त केले. पाश्चिमात्य देशांसमोरील आव्हानेही त्यांनी सांगितली.

Advertisement

रशियाने पश्चिमी देशांना धमकावले..! म्हणाला, ‘तसे’ करणे कुणालाच शक्य नाही; जाणून घ्या..

Advertisement

Ukraine War : युक्रेनच्या अध्यक्षांचे जागतिक नेत्यांना आवाहन; सांगितला रशियाला अडचणीत आणण्याचा प्लान..

Advertisement
Advertisement

Leave a Reply