Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

श्रीलंकेच्या वाटेवर पाकिस्तान..! देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब; तज्ज्ञांनी दिलाय ‘हा’ इशारा..

दिल्ली – सरकार बदलले, पंतप्रधान बदलला पण तरीसुद्धा पाकिस्तानची स्थिती बदलली नाही. पाकिस्तानातील आर्थिक संकट (Financial Crisis In Pakistan) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे रुपयाने आतापर्यंत सर्वात खराब कामगिरी नोंदवली आहे तर दुसरीकडे पाकिस्तानची तिजोरी रिकामी झाली आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा (Foreign Reserve Reduced) दहा अब्ज अमेरिकन डॉलरवर घसरला. इतकेच नाही तर पाकिस्तान आता श्रीलंकेच्या वाटेवर असल्याचे पाकिस्तानच्या आर्थिक घडामोडींचे तज्ज्ञ सांगत आहेत आणि अशीच स्थिती राहिल्यास लवकरच पाकिस्तानला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.

Advertisement

तसे पाहता पाकिस्तान आधीच आर्थिक संकटाचा सामना करत होता. दरम्यान, नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांच्या सरकारने परदेशातील अशा वस्तूंवर बंदी टाकली जी लोक दैनंदिन वापरासाठी खरेदी करतात. लक्झरी वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे देशाचे मौल्यवान परकीय चलन वाचणार असल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितले.

Advertisement

पाकिस्तानवरील कर्जाचा भार (Loan On Pakistan) वाढत असून परकीय चलन साठा वेगाने कमी होत आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा परकीय चलन साठा USD 328 दशलक्षने घसरून USD 10.558 अब्ज झाला आहे. एवढ्या कमी परकीय चलनाच्या साठ्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक संकट सोडविण्यासाठी पाकिस्तान सरकार करत असलेल्या उपाययोजना कमजोर ठरत आहेत. पाकिस्तानी चलन (Pakistani Currency) डॉलरच्या तुलनेत आणखी कमकुवत होईल.

Advertisement

पाकिस्तानातील आर्थिक संकट वाढले तर पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. दरम्यान, शाहबाज शरीफ यांच्या सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपुढे (IMF) गुडघे टेकले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचे कर्ज वाढत आहे. डिसेंबर 2021 मध्ये तो 51 लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता. या कर्जातील सुमारे 21 लाख कोटी रुपये विदेशी कर्ज आहे. आणि IMF च्या मते, पाकिस्तानवर त्याच्या GDP च्या 74 टक्के कर्ज आहे.

Loading...
Advertisement

अलीकडेच पाकिस्तानी रुपयाने डॉलरच्या तुलनेत 200 चा टप्पा गाठला आहे. म्हणजेच एका डॉलरची किंमत 200 पाकिस्तानी रुपये झाली आहे. पाकिस्तानी रुपयाच्या विक्रमी घसरणीमुळे महागाई आणखी वाढण्याची भीती आहे. ट्रेडिंग इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये घाऊक महागाई  (Inflation Increase In Pakistan) 13 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये घाऊक महागाईचा दर 28.2 टक्क्यांवर पोहोचला होता. त्याचप्रमाणे किरकोळ महागाई 13.4 टक्क्यांवर पोहोचली आहे. जी जानेवारी 2021 नंतरची सर्वोच्च पातळी आहे.

Advertisement

पाकिस्तानची आर्थिक घडामोडी तपासणारी संस्था एफबीआरचे माजी अध्यक्षांनी नुकतेच सांगितले की, पाकिस्तानची स्थिती श्रीलंकेपेक्षा (Sri Lanka) वेगळी नाही आणि पाकिस्तानही डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर आहे. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था वेगाने ढासळत आहे आणि पाकिस्तानला तातडीने मोठी मदत मिळाली नाही, तर येत्या काही महिन्यांत देशाची स्थिती श्रीलंकेसारखीच होईल, हे खरे आहे.

Advertisement

पेट्रोलसाठी पाकिस्तानची वेगळीच युक्ती; घेतला ‘तो’ मोठा निर्णय, अनेक चर्चांना उधाण

Advertisement

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे पाकिस्ताननेही केले कौतुक; पहा, काय म्हणतोय शेजारी देश..

Advertisement
Advertisement

Leave a Reply