Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युद्धादरम्यान पुतिन यांना मोठा झटका; घडलं असं काही; जाणुन घ्या संपूर्ण प्रकरण

 

Advertisement

दिल्ली –  युक्रेनवरील (Ukraine) आक्रमणाला ‘लज्जास्पद’ म्हणत जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रातील एका रशियन (Russian) राजनयिकाने सोमवारी पद सोडले. त्यांनी या युद्धाला दोन्ही देशांविरुद्ध गुन्हा म्हटले आहे. रशियन मुत्सद्दी बोरिस बोंडारेव्ह (41) म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये “आक्रमक युद्ध सुरू करण्या” विरोधात परदेशी सहयोगींना पत्र पाठवण्यापूर्वी त्यांनी राजीनामा सादर केला होता.

Advertisement

सोमवारी सकाळी रशियन मिशनला मिळालेल्या पत्रात बोरिस यांनी आपल्या राजीनाम्याची पुष्टी केली. युक्रेनवरील रशियन हल्ल्याच्या तारखेचा संदर्भ देत बोरिस यांनी लिहिले की, “राजनीती म्हणून माझ्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मी परराष्ट्र धोरणात अनेक बदल पाहिले आहेत, परंतु या वर्षी 24 फेब्रुवारीपूर्वी मला माझ्या देशाची इतकी लाज वाटली नाही. .”

Advertisement

“पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध सुरू केलेले युद्ध किंवा त्याऐवजी संपूर्ण पाश्चिमात्य देशांविरुद्ध छेडलेले युद्ध हे केवळ युक्रेनच्या लोकांविरुद्धच नाही तर रशियाच्या लोकांविरुद्धही एक गंभीर गुन्हा आहे,” असं ते म्हणाले . विशेष म्हणजे या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता.

Loading...
Advertisement

फोनवर संपर्क साधला असता, रशियन मुत्सद्दी बोरिस यांनी राजीनाम्याची पुष्टी केली, त्यांनी राजदूत गेनाडी गॅटिलोव्ह यांच्याकडे राजीनामा सादर केल्याचे सांगितले. बोरिस म्हणाले, ‘माझे सरकार आता जे करत आहे ते असह्य आहे. एक सरकारी कर्मचारी या नात्याने माझ्यावरही याची काही जबाबदारी असेल आणि मी त्यासाठी तयार नाही.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

राजीनामा दिल्यानंतर रशियन अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मिशनच्या प्रवक्त्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply