Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Ukraine War : युक्रेनच्या अध्यक्षांचे जागतिक नेत्यांना आवाहन; सांगितला रशियाला अडचणीत आणण्याचा प्लान..

मुंबई – युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी जागतिक नेत्यांना रशियावर जास्तीत जास्त निर्बंध लादण्याचे आवाहन केले. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) वार्षिक परिषद 2022 मध्ये त्यांनी सर्व रशियन बँका आणि रशियन तेलाच्या व्यापारावर बंदी व्यतिरिक्त सर्व व्यापार संपविण्याचे आवाहन केले. झेलेन्स्की म्हणाले, की हे ठरवले पाहिजे की एक निरंकुश सत्ता जगावर राज्य करेल का ? मूल्यांचा आदर केला पाहिजे.

Advertisement

झेलेन्स्की यांनी असेही सांगितले की आम्ही युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या कामासाठी तयार आहोत आणि या कामात अफाट क्षमता उपलब्ध करून देऊ. आम्ही आमचे भागीदार देश, शहरे आणि कंपन्यांना विशिष्ट प्रदेश किंवा शहराचे संरक्षण घेण्याची विनंती करू इच्छितो. डेन्मार्क (Denmark) आणि युरोपियन युनियनने (European Union) आधीच प्रदेश निवडले आहेत. झेलेन्स्की यांनी परिषदेत उपस्थित नेत्यांना युक्रेनशी व्यापारी संबंध प्रस्थापित करून रशियाला एकटे पाडण्याचे आवाहन केले.

Advertisement

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाबरोबर सुरू असलेल्या युद्धात युक्रेनचे (Russia Ukraine War) आतापर्यंतचे सर्वात मोठे लष्करी नुकसान झाले आहे. झेलेन्स्की म्हणाले की, गेल्या आठवड्यात उत्तर भागातील एका बॅरेकवर झालेल्या रशियन हल्ल्यात 87 युक्रेनियन सैनिक ठार झाले. प्रशिक्षण शिबिरात असलेल्या या बॅरेकमध्ये युक्रेनचे सैनिक राहत होते. याआधी रशियाने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राने प्रशिक्षण शिबिराला लक्ष्य केल्याचे सांगितले.

Loading...
Advertisement

दरम्यान, नाटोमध्ये सामील होण्याच्या भीतीने रशियाने युक्रेनवर हमला केला होता आज त्याच संघटनेच्या सैन्याने रशियासमोर आव्हान उभे केले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, एकूण 40 हजार सैनिक रशियाच्या पूर्व युरोपीय देशांच्या सीमेवर तैनात आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये, रशियाच्या युक्रेनवर हमल्याच्या एक वर्ष आधी 4,650 सैन्य थेट नाटोच्या (NATO) आदेशानुसार तैनात करण्यात आले होते. एस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनियामध्ये तैनात असलेल्या या सैनिकांमध्ये विविध 4 देशांतील सैनिकांचा समावेश होता. यानंतर रशियाकडूनही सैन्याची तैनाती वाढवण्यात आली.

Advertisement

रशियाने युक्रेनच्या सीमेवर सैन्याची तैनाती वाढवली असून, बचावात्मक बाजूने हे पाऊल उचलले आहे. रशियाने (Russia) म्हटले आहे की, 1990 नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जेव्हा नाटोने आमच्या पूर्व सीमेवर अशाप्रकारे वेढा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र रशियाच्या या कारवाईनंतर नाटोची आक्रमकता आणखी वाढली. त्याने रशियाला लागून असलेल्या त्याच्या मित्र राष्ट्रांमध्ये सैन्याची तैनाती वाढवली आणि तीव्र केली. युक्रेनवरील हमल्यानंतर (Russia Ukraine War) नाटो संघटनेचा भाग असलेल्या देशांमध्ये रशियाच्या पूर्व सीमेवर नाटोच्या सैन्याची संख्या 40,000 च्या पुढे गेली आहे.

Advertisement

रशिया भडकणार..! ‘त्यासाठी’ युरोपीय देशात नाटोने आखलाय वेगळाच प्लान; जाणून घ्या, डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply