Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चिन्यांचा डाव ओळखला..! कॅनडाने घेतला चीनला झटका देणारा ‘हा’ निर्णय; जाणून घ्या..

दिल्ली – कॅनडाच्या जस्टिन ट्रुडो सरकारने चीनची दिग्गज तंत्रज्ञान कंपनी Huawei आणि GTE ला मोठा झटका दिला आहे. कॅनडाच्या (Canada) सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रूडो सरकारने Huawei आणि ZTE च्या 5G आणि 4G वायरलेस नेटवर्क सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसारमाध्यमांना माहिती देताना कॅनडाचे मंत्री फ्रँकोइस फिलिप शॅम्पेन म्हणाले, की “आम्ही कॅनडाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना (Chinese Telecom Companies) येथे सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देऊ शकत नाही.” ज्या पुरवठादारांनी त्यांची उपकरणे स्थापित केली आहेत त्यांना त्याचा वापर थांबवण्यास आणि काढून टाकण्यास सांगितले आहे.

Advertisement

कॅनडाआधी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटेन यांनी Huawei च्या 5G सेवेवर बंदी घातली आहे. आता Huawei ला 5G सेवा देण्यासाठी उपकरणे बसवण्याची परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडाने Huawei वर इतक्या उशीराने बंदी का घातली असे विचारले असता, फ्रँकोइस फिलिप शॅम्पेन म्हणाले, की “ही शर्यत नव्हती, तर योग्य निर्णय घेण्याचा प्रश्न होता.”

Advertisement

कॅनडाने हुवेईच्या हेरगिरीबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की Huawei च्या मंजुरीमुळे चीनला (China) कॅनेडियन नागरिकांची हेरगिरी करणे अधिक सहज शक्य होईल. काहींचे म्हणणे आहे की चीनी सुरक्षा एजन्सी Huawei ला कंपनीला वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडू शकतात. Huawei ने सातत्याने आग्रह धरला आहे, की ही एक स्पष्टपणे स्वतंत्र कंपनी आहे जी बीजिंगसह कोणाचीही हेरगिरी करत नाही. कॅनडाचे इनोव्हेशन मंत्री शॅम्पेन यांनी सांगितले की, सुरक्षा एजन्सींच्या चिंतेचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर Huawei वर बंदी घालण्याचा निर्णय (Chinese Telecom Companies Ban in Canada) घेण्यात आला आहे. आम्ही नेहमीच कॅनेडियन लोकांचे संरक्षण करू आणि आमच्या दूरसंचार पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू.

Loading...
Advertisement

चीन सरकारने Huawei वरील हेरगिरीचे आरोप ठामपणे फेटाळून लावले असून कंपनीकडून कोणत्याही देशाच्या सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचे सांगत अमेरिकेला (America) लक्ष्य केले आहे. दूरसंचार कंपनी Huawei ची वाढ रोखण्यासाठी अमेरिका फक्त प्रयत्न करत आहे, असे चीनने म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी Huawei वर बंदी घालण्यासाठी प्रमुख यूएस मित्रांमध्ये जोरदार प्रयत्न केले होते. याआधी भारताने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या शेकडो चिनी अॅपवरही बंदी घातली आहे. या अॅपवर भारतीय नागरिकांची माहिती चोरून चीनला दिल्याचा आरोप आहे.

Advertisement

अर्र.. घ्या आता..! पाकिस्तानच देणार चीनला झटका; चीनच्या ‘त्या’ प्रकल्पाविरोधात सुरू केलीय मोठी तयारी..

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply