Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोठा अपडेट.. रशियन सैन्याबाबत युक्रेनने केलाय ‘हा’ दावा; जाणून घ्या..

दिल्ली – युक्रेनच्या लष्कराने शनिवारी सांगितले की, देशाचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किववर (Kharkiv) बॉम्बफेक केल्यानंतर रशियन सैन्याने (Russian Military) त्याच्या आसपासच्या परिसरातून माघार घेतली आहे. दुसरीकडे, कीव आणि मॉस्कोचे सैनिक देशाच्या पूर्वेकडील औद्योगिक क्षेत्रासाठी संघर्ष करत आहेत. युक्रेनच्या (Ukraine) लष्कराने सांगितले की, रशियाचे सैन्य ईशान्येकडील खार्किव शहरातून माघार घेत आहेत आणि आता पुरवठा मार्गाच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करत आहेत. ते म्हणाले की रशियन सैन्याने “युक्रेनियन सैन्याला लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांचे बॅरिकेड्स नष्ट करण्यासाठी डोनेत्स्कच्या पूर्व भागात हवाई हमले सुरू केले.”

Advertisement

युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह म्हणाले, की “युक्रेन दीर्घकालीन युद्धाच्या नव्या जमान्यात प्रवेश करत आहे.” युक्रेनला अमेरिकेचा पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे. 24 फेब्रुवारीच्या हमल्यानंतर कीव ताब्यात घेण्यात अयशस्वी झाल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व डॉनबास परिसराकडे लक्ष दिले आहे. हे एक औद्योगिक क्षेत्र आहे जिथे युक्रेन 2014 पासून मॉस्को-समर्थित फुटीरतावाद्यांच्या विरोधात लढत आहे. पूर्वेकडील क्षेत्रात तैनात असलेल्या युक्रेनच्या सर्वात अनुभवी आणि अत्यंत कुशल सैनिकांना घेरणे हे रशियन सैन्याचे उद्दिष्ट आहे. त्याच वेळी, डोनबासचे क्षेत्र आणि युक्रेनच्या ताब्यात असलेल्या उर्वरित प्रदेशांवर नियंत्रण ठेवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

Advertisement

झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनच्या सैन्याने पूर्वेकडील भागातही प्रगती केली आहे आणि सहा शहरे किंवा गावे पुन्हा ताब्यात घेतली आहेत. शनिवारच्या आपल्या भाषणात ते म्हणाले, की ‘डॉनबासमधील परिस्थिती खूप कठीण आहे आणि रशियन सैन्य अद्याप एक किंवा दुसऱ्या मार्गाने जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे.’ त्यांना मात्र या परिसरातून निघून जाण्यास भाग पाडले जात आहे.

Loading...
Advertisement

रशियाच्या सीमेजवळ असलेल्या खार्कीववर अनेक आठवड्यांपासून जोरदार बॉम्बफेक सुरू आहे. प्रादेशिक गव्हर्नर ओलेह सिनेगुबोव्ह म्हणाले की, खार्किवमध्ये आदल्या दिवशी कोणताही बॉम्बस्फोट झाला नाही. ते म्हणाले की युक्रेनने खार्किवच्या दक्षिणेकडील शहर लिझियमजवळ आक्रमकताविरोधी कारवाई सुरू केली आहे.

Advertisement

युक्रेननंतर आता ‘या’ देशावर भडकला रशिया; दिला गंभीर इशारा

Advertisement

अमेरिकेचा मोठा निर्णय..! ‘त्यासाठी’ युक्रेनला दिलेत 40 अब्ज डॉलर्स; रशियाची डोकेदुखी वाढणार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply