Take a fresh look at your lifestyle.

श्रीलंकेतील संकट वाढले..! पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर परिस्थिती बिघडली; पहा, काय सुरू आहे शेजारी..

दिल्ली – श्रीलंकेतील (Sri Lanka) अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीमुळे गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी विरोधकांच्या दबावाखाली राजीनामा (Resignation) दिला. त्यानंतर सर्वत्र हिंसक घटना घडत आहेत. राजपक्षे कुटुंबीयांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये रस्त्यावर चकमकी सुरू आहेत. सरकार समर्थकांच्या हिंसाचारात (Violence) आतापर्यंत खासदारांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

पोलिसांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर परिस्थिती चिघळली. सैन्याला पाचारण करावे लागले. सर्वसामान्यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदार, मंत्र्यांसह अन्य नेत्यांवर हमले करण्यास सुरूवात केली. गाले येथे निदर्शने करणाऱ्या लोकांचे तंबू सरकार समर्थक निदर्शकांनी उखडून टाकण्यास सुरुवात केली तेव्हा हाणामारी सुरू झाली. सरकार समर्थकांनी आंदोलकांवर हल्ला केल्यानंतर उलट हिंसाचार सुरू झाला. कोलंबोमध्ये झालेल्या या संघर्षात 138 जण जखमी झाले होते. त्यांना कोलंबो नॅशनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे मोठ्या शहरांमध्ये सैन्य तैनात करू शकतात, असे मानले जात आहे.

Advertisement

1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. हे लक्षात घेऊन, बांगलादेशने दिलेल्या $ 200 दशलक्ष परतफेडीचा कालावधी एका वर्षाने वाढ केला आहे. श्रीलंकेला 3 महिन्यांत कर्जाची परतफेड करायची होती, परंतु त्यानंतर श्रीलंका गंभीर आर्थिक संकटात अडकला. यानंतर बांगलादेशने कर्ज परत करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे.

Advertisement

दरम्यान, श्रीलंकेत अत्यावश्यक औषधांचीही प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने शेजारील देशात आवश्यक औषधे पाठवली होती. सध्या बहुतेक औषधे (Medicines) भारतातून येत आहेत. कोविड (Covid) आजाराच्या सुरुवातीपासून श्रीलंकेची अर्थव्यवस्था सातत्याने कोलमडत चालली आहे. त्यामुळे 2 कोटींहून अधिक लोकांना अन्न आणि औषधांची टंचाई जाणवत आहे. 1948 नंतरचे हे देशातील सर्वात मोठे आर्थिक संकट आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीलंकन ​​रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत वेगाने घसरले आहे आणि त्यावरील विदेशी कर्ज सातत्याने वाढत आहे. गेल्या एक महिन्यापासून श्रीलंकेत आर्थिक संकट (Financial Crisis) आहे. किंबहुना, चीनशी असलेली जवळीक आणि त्यातून मिळणारे प्रचंड कर्ज यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला (Economy) मोठा फटका बसला. या सर्व प्रकारामुळे श्रीलंका 51 अब्ज डॉलर्सच्या कर्जात (Loan) बुडाला होता.

Advertisement

चीनवर अमेरिकेचा मोठा आरोप..! कर्जाच्या नावाखाली चीनने केलाय वेगळाच प्रकार; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply