Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘NATO’ करत होता गडबड, म्हणून आम्ही घेतला ‘तो’ मोठा निर्णय; पहा, काय म्हणालेत रशियाचे अध्यक्ष

दिल्ली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी मॉस्को (Moscow) शहरातील रेड स्क्वेअर येथे दुसऱ्या महायुद्धाच्या (Second World War) 77 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात पाश्चात्य देश रशियाला कमकुवत करत असल्याचा आरोप केला. तसेच रशियावर हमला करण्याचीही त्यांची तयारी होती असे सांगितले. नाटो (NATO) आपल्या देशाच्या बॉर्डरवर धोका उत्पन्न करत होता, ही माहिती मिळताच 24 फेब्रुवारीला लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पुतिन यांनी सांगितले.

Advertisement

11 मिनिटांच्या भाषणात पुतिन यांनी युक्रेनचा (Ukraine) एकदाही उल्लेख केला नाही. त्याने युक्रेन युद्धाबाबत काहीही जाहीर केले नाही. मात्र पूर्व युक्रेनच्या डोनबास भागात लढणाऱ्या सैनिकांना उद्देशून ते म्हणाले, की तुम्ही देशासाठी लढत आहात. देशाच्या भविष्यासाठी लढत आहात. दुसऱ्या महायुद्धाचा अनुभव कोणीही विसरता कामा नये. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत सैन्याचे दोन कोटी 70 लाख लोक मारले गेले होते.

Advertisement

युक्रेन युद्धाच्या 75 व्या दिवशी आयोजित विजय दिनाच्या समारंभात पुतिन यांनी सुरू असलेल्या युद्धाबद्दल कोणतीही विशिष्ट घोषणा केली नाही. त्यामुळे असे दिसते, की युक्रेनमधील रशियन कारवाया आणखी काही दिवस चालू राहतील. तत्पूर्वी रशियन सैन्याने आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक दाखवले. रशियाचे अत्याधुनिक आर्माटा आणि T-90M प्रोरिव्ह रणगाडे हे परेडचे प्रमुख आकर्षण होते.

Loading...
Advertisement

दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनीवरील विजयाच्या वर्धापनदिनानिमित्त, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, त्यांचा देश कोणताही प्रदेश न गमावता रशियासोबत सुरू असलेले युद्ध जिंकेल. वरवर पाहता, झेलेन्स्की क्रिमिया आणि डॉनबासमधील क्षेत्रांचा संदर्भ देत होते जो 2014 मध्ये रशियन सैन्याने आणि रशियन-समर्थित बंडखोरांनी युक्रेनमधून घेतले होते. झेलेन्स्की म्हणाले, की “1945 मध्ये या दिवशी आम्ही नाझीवादावर विजय मिळवला आणि आता आम्ही नवीन विजयासाठी लढत आहोत.” रस्ता खडतर आहे पण आपण जिंकूच, यात शंका नाही. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी रशिया आणि युक्रेन सोव्हिएत युनियनमध्ये सहभागी होते. सोव्हिएत युनियनने मित्र राष्ट्रांसह जर्मनीच्या सैन्याचा पराभव केला होता.

Advertisement

रशियामुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा; भारतीय कंपन्यांकडून होतेय ‘या’ इंधनाची जोरदार खरेदी..

Advertisement

G7 देश रशियाच्या विरोधात..! श्रीमंत देशांनी रशियाला दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; रशियाचे होईल मोठे नुकसान

Advertisement
Advertisement

Leave a Reply