दिल्ली : चीन असा देश आहे ज्याने जगाला थक्क केले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियासह संपूर्ण युरोप तसेच ड्रॅगनच्या सीमारेषा वाटून घेणारे नाराज आहेत. समुद्रापासून जमिनीपर्यंत सर्वच देश चीनच्या कारवायांमुळे त्रस्त आहेत. इतकंच नाही तर चीनने आपल्या नागरिकांनाही त्रास दिला आहे. चीन उइगर मुस्लिमांवर (Uyghurs are a Turkic ethnic group native to Xinjiang) पाळत ठेवत आहे. चीन त्यांच्यावर जे अत्याचार करत आहे, ते पाहता तालिबानपेक्षा अधिक क्रूर होत आहे, असे म्हणता येईल. आता पुन्हा एकदा चीन आपल्या काही कारवायांमुळे चर्चेत आला आहे. भारतात जसे धार्मिक मुद्द्यावरून राजकारण चालू आहे. तसे चीनमध्ये वांशिक मुद्द्यावर हा सरकारी खेळ खेळला जात आहे.
EV Auto News: ‘त्यामुळे’ ई-बाईक पेटण्याच्या घटना..! पहा समितीने नेमक्या काय केल्यात सूचना https://t.co/eAYCIz5UZn
Advertisement— Krushirang (@krushirang) May 7, 2022
Advertisement
मुस्लिम असलेल्या सर्व उइगरांना चीनने शिनजियांग भागात डांबून ठेवले आहे आणि ड्रॅगनचे दडपशाहीचे धोरण येथे सुरू आहे. एका वृत्तानुसार चीनने शिनजियांगमधील सात शिक्षकांना कैद केले आहे. यापूर्वी गुलजा परिसरातून 10 शिक्षकांनाही कैद करण्यात आले होते. रेडिओ फ्री एशियाने सांगितले की शाळेचे माजी मुख्याध्यापक दिलमुरत अब्दुरेहिम सुमारे एक वर्षापूर्वी बेपत्ता झाले होते. स्थानिक पोलीस आणि शाळेच्या कर्मचार्यांनी पुष्टी केली आहे की तुरुंगात असलेल्या 10 शिक्षकांपैकी किमान सात शिक्षक अजूनही तुरुंगात आहेत. अहवालानुसार ताजिक, कझाक आणि उइघुर यांसारख्या अल्पसंख्याकांवर चीनमधील बंदी शिबिरांमध्ये सतत हिंसाचार केला जातो आणि त्यांच्यावर सतत नजर ठेवली जाते. (law against children attending mosques on non-Uyghurs outside Xinjiang)
Afghanistan News: तालिबान्यांनी काढले नवीन फर्मान; पहा महिलांना नेमक्या काय दिल्यात सूचना https://t.co/ejyd7sqTuQ
Advertisement— Krushirang (@krushirang) May 7, 2022
Advertisement
अहवालानुसार, शाळेच्या सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की तीन कझाक शिक्षकांना पुनर्शिक्षण शिबिरात नेण्यात आले. परंतु नंतर त्यांना सोडण्यात आले आणि ते आता हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत. कमर, नूरजान आणि इझेल सारख्या काही कझाक शिक्षकांना पुनर्शिक्षण शिबिरात पाठवण्यात आले. चीनला या शिक्षकांकडून जास्त धोका वाटतो. कारण, ते शस्त्राने लढत नाहीत तर पेनने लढतात आणि पेनची ताकद जगातील प्रत्येक शक्तीपेक्षा मोठी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चिनी अधिकाऱ्यांनी शिनजियांगमधील शिक्षक आणि विचारवंतांना सातत्याने लक्ष्य केले आहे. कारण ते उइघुर समाजाचे आहेत आणि उईघुर संस्कृती (Islam is an important aspect of Uyghur identity) आणि ओळख जपण्यात (Islamic leaders during the Cultural Revolution) आणि वाढविण्यात त्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. यामुळेच शिनजियांगमध्ये शिक्षकांना लक्ष्य केले जात आहे. 2017 पासून शिनजियांगमधील 1.8 दशलक्षाहून अधिक उइघुर आणि इतर तुर्किक अल्पसंख्याकांना अटकाव शिबिरांच्या नेटवर्कमध्ये ठेवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, चीन सरकार आपली गैरकृत्ये लपविण्याचा प्रयत्न करते आणि ते नाकारते. पण, त्याचे वास्तव वेळोवेळी समोर येत आहे.
China News: चीनच्या ‘त्या’ धोरणामुळे जगाची झालीय कोंडी; पहा नेमका काय खेळ केलाय मुजोर देशाने https://t.co/wXGcRse8cu
Advertisement— Krushirang (@krushirang) May 7, 2022
Advertisement