Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आर्थिक संकटाचे चटके..! भारताच्या शेजारी देशात पुन्हा आणीबाणी; लोकांनी सरकारला केले हैराण..

दिल्ली – आर्थिक संकटात अत्यंत वाईट पद्धतीने अडकलेल्या श्रीलंकेतील सध्याची परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. तीव्र मंदीमुळे जनतेच्या तीव्र विरोधाचा सामना करत असलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी मध्यरात्रीपासून देशात पुन्हा आणीबाणी जाहीर केली आहे. याआधी शुक्रवारी सकाळी श्रीलंकेच्या संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे आणि पाण्याच्या मारा केला.

Advertisement

दुसरीकडे, श्रीलंकेतील अनेक व्यापारी संघटनांनी सरकारच्या राजीनाम्याची मागणी करत संप सुरू केला आहे. दरम्यान, गेल्या एक महिन्यापासून श्रीलंकेतील आर्थिक संकट कमी होण्याऐवजी त्यात सातत्याने वाढ होत आहे. देशात अन्नपदार्थ आणि औषधांची (Medicines) तीव्र टंचाई आहे. दुसरीकडे पेट्रोल (Petrol) विकत घेण्यासाठीही देशाकडे पैसे नाहीत. सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे.

Advertisement

सरकारच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. आर्थिक संकटाचा सामना करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत लोक राजीनाम्याची (Resignation) मागणी करत आहेत. 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. संसदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर हजारो विद्यार्थी जमले आहेत.

Advertisement

शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या एका गटाने श्रीलंकेच्या संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान जमाव पोलिस बॅरिकेडिंगच्या मागे लपला, त्यामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली. याआधी गुरुवारी संसद मार्गावरून जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचा मारा केला होता, मात्र गुरुवारीही पोलिसांना यश आले नाही.

Loading...
Advertisement

दरम्यान, चीनवर जगभरातून टीका होत आहे. कर्ज प्लानच्या माध्यमातून विकसनशील देशांना चीनवर अवलंबून राहण्यास भाग पाडल्याचा आरोप अमेरिकेने (America) केला आहे. गेल्या दशकात चीनने अनेक देशांना कर्ज दिले आहे. अलीकडच्या काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर चीनच्या (China) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपेक्षा जास्त कर्ज (Loan) दिले आहे.

Advertisement

चीनने कर्जाच्या अटीही अशा केल्या आहेत की विकसनशील देशांना त्यांचे पालन करणे कठीण जाते. ताजे प्रकरण श्रीलंकेचे (Sri lanka) आहे जिथे आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. आता श्रीलंका चीनकडून आणखी कर्ज मागत असताना चीनने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. श्रीलंकेने चीनकडे 2.5 अब्ज डॉलर्सची मदत मागितली होती, ज्याला चीनने प्रतिसाद दिलेला नाही.

Advertisement

चिन्यांचा खतरनाक खेळ..! फक्त श्रीलंकाच नाही तर तब्बल ‘इतके’ देश अडकलेत ‘त्या’ सापळ्यात..

Advertisement
Advertisement

Leave a Reply