Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Sri Lanka Issue: लंकेमध्ये महागाईचा आगडोंब..! पहा कसे खायचे वांधे झालेत तिथे

Please wait..

कोलंबो : भारताचा शेजारी देश आणि पर्यटनस्थळे पाहण्यासाठी जगाचे आकर्षण असणारा श्रीलंका देश (Crisis-ridden Sri Lanka) सध्या खूप वाईट स्थितीत आहे. येथील केंद्रीय राजकारण्यांनी लोकांना अंधारात ठेऊन राष्ट्रवाद (Nationalism) आणि वंशवाद (Religion) आधारित राजकारण (Politics) करून देशाचे वाटोळे केले आहे. या देशात सध्या नागरिकांना खाण्याचे वांधे झालेले आहे. एकूणच स्थिती खूप बिकट झाली आहे.

Advertisement
Loading...

कोलंबो येथील ग्राहक किंमत निर्देशांकातील (consumer sensex) वर्ष-दर-वर्षाच्या बदलावर आधारित एप्रिलमध्ये श्रीलंकेची चलनवाढ 29.8 टक्क्यांनी वाढली आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेने (Central Bank) ही माहिती दिली. मध्यवर्ती बँकेच्या मते, ही वाढ अन्न (Food) आणि गैर-खाद्य या दोन्ही श्रेणींमध्ये मासिक वाढीमुळे झाली आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाई 46.6 टक्क्यांनी वाढली आहे, तर खाद्येतर महागाई 22 टक्क्यांनी वाढली आहे. अखाद्य श्रेणीतील वस्तूंच्या किमतीत वाढ प्रामुख्याने वाहतूक (transportation), पाणी (water), वीज (electricity) आणि गॅस (LPG Gas) यांसारख्या क्षेत्रांमध्ये दिसून आली, तर खाद्य श्रेणीतील वस्तूंच्या किमती दूध पावडर (Milk Powder), तांदूळ (Rice), ब्रेड यांच्या किमतींमध्येही दिसून आल्या. कडधान्य, साखर (Sugar) आणि सुकी मासळी (dry fish) वाढ नोंदवली गेली. आपल्या गगनाला भिडणाऱ्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी श्रीलंकेने अलीकडेच व्याजदरात वाढ (bank loan interest emi) केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply