Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया युरोपवर पु्न्हा भडकला..! युक्रेनला केलेली मदत ठरेल.. पहा, काय धमकी दिलीय

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला (Russia Ukraine War) 64 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही युक्रेनवरील संकटाचे ढग कमी होण्याचे नाव घेत नाहीत. रशियाच्या हमल्याने युक्रेनमधील अनेक शहरे उद्धवस्त झाली आहेत, तर अनेक शहरे ढिगाऱ्याखाली आहेत. कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. दरम्यान, युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवठा करणे युरोपसाठी (Europe) धोकादायक ठरेल, अशी धमकी रशियाने युक्रेनला मदत करणाऱ्या युरोपीय देशांना दिली आहे.

Advertisement

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इतर देशांकडून युक्रेनला अवजड शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे ही एक प्रवृत्ती आहे ज्यामुळे भविष्यात युरोपीय देशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. युद्धा दरम्यान युक्रेनला शस्त्रे दिल्याने युरोपमध्ये सुरक्षेत अस्थिरता निर्माण होते.

Advertisement

दिमित्री पेस्कोव्ह यांनी बुधवारी ब्रिटनचे (Britain) परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांनी केलेल्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना ही माहिती दिली. युक्रेनला अवजड शस्त्रांचा पुरवठा सुरू राहिल्यास युरोप सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, रशियाच्या हमल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे रशियन सैनिकांवर कारवाई करण्यासाठी जगभरातील सर्व शक्तिशाली देशांकडून शस्त्रांची मागणी करत आहेत. परंतु युक्रेनला मदत करणारे सर्व देश अशी परिस्थिती टाळू इच्छितात ज्यामुळे नाटो आणि रशिया यांच्यात थेट संघर्ष होऊ शकेल.

Advertisement

क्रेमलिनच्या प्रवक्त्याआधी बुधवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनीही इशारा दिला की, युक्रेन रशियन युद्धात हस्तक्षेप करतील किंवा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील अशा देशांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे सर्व मार्ग रशियाकडे आहेत. याबरोबरच रशियाने अमेरिकेला युक्रेनला शस्त्रे पाठवू नयेत असेही सांगितले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, युक्रेन विरोधात सुरू असलेल्या युद्धा दरम्यान (Russia Ukraine War) रशियानेही आपले इरादे जगाला सांगितले आहेत. रशियन सैन्याच्या जनरलने स्पष्टपणे सांगितले आहे, की दक्षिण युक्रेनवर कब्जा करणे हे त्यांचे लक्ष्य आहे. रशियन सैन्याच्या जनरलच्या या विधानाने रशियाला युक्रेनचा भूभाग ताब्यात घ्यायचा नाही असे आधीचे सर्व वक्तव्ये खोटे होते, हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रशियन सैन्याने खार्किव प्रदेशातील एक मोठा शस्त्रसाठा ताब्यात घेतल्याचेही वृत्त मिळाले आहे. येथे हजारो टन दारूगोळा आणि शस्त्रे आहेत.

Advertisement

त्याचवेळी हे युद्ध थांबवण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्राचे (United Nations) महासचिव अँटोनिया गुटेरेस मॉस्कोला भेट देणार आहेत. रशियन सैन्याच्या वतीने असे सांगण्यात आले आहे, की त्यांनी डॉनबाससह जवळजवळ संपूर्ण दक्षिण युक्रेन ताब्यात घेतला आहे आणि आता ते दक्षिणेकडे मोल्दोव्हाच्या दिशेने जात आहेत. रशियाच्या म्हणण्यानुसार, लष्कराने युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याचे लक्ष्य गाठले आहे.

Advertisement

अमेरिकेला जोरदार झटका..! एकट्या जर्मनीनेच रशियाकडून खरेदी केले ‘इतके’ इंधन; पहा, काय आहे अहवाल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply