Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. पाकिस्तान घाबरला..! नव्या पंतप्रधानांनी अमेरिकेबाबत केले मोठे वक्तव्य; जाणून घ्या..

दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी त्यांचे सरकार पाडण्यात अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर पाकिस्तानच्या राजकारणा जोरदार राजकीय वादळ उठले होते. पण, आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान अमेरिकेशी शत्रुत्व सहन करू शकत नाही, असे म्हटले आहे.

Advertisement

11 एप्रिल रोजी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनलेले शाहबाज शरीफ म्हणाले की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अशा देशांवर टीका केले जे नेहमीच संकटाच्या काळात पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहिले. विशेषतः चीन, सौदी अरेबिया, कतार आणि अमेरिकेचा उल्लेख करत शाहबाज यांनी हे वक्तव्य केले.

Advertisement

शरीफ पुढे म्हणाले की, अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील परस्पर संबंधांमधील विश्वासाची कमतरता लवकरात लवकर दूर करणे आवश्यक आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार शाहबाज शरीफ म्हणाले की, भूतकाळात आपण केलेल्या वागणुकीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शहाबाज शरीफ म्हणाले की, अमेरिकेशी शत्रुत्व पत्करण्याची आपल्यात क्षमता नाही. विशेष म्हणजे, इम्रान खान यांनी आरोप केला होता की, चीन, अफगाणिस्तान आणि रशियाबरोबरचे त्यांचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण अमेरिकेला पसंत नाही, त्यामुळे अमेरिकेने त्यांचे सरकार पाडण्याचे काम केले.

Advertisement

अमेरिका दरवर्षी पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्स मदत म्हणून देतो. ज्याचा संबंध थेट पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेशी आहे. अमेरिकेने पाकिस्तानला मदत करणे बंद केले तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. त्यामुळे अमेरिकेची नाराजी पत्करणे कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानसाठी फायदेशीर नाही. त्यामुळे आता नवीन सरकार पुन्हा अमेरिकेची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, पाकिस्तानमध्ये गंभीर आर्थिक संकट आहे. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. दरम्यान, आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील नवीन सरकारला दिलासा देत, IMF ने रखडलेले बेलआउट पॅकेज एक वर्षाने वाढ करण्यास आणि कर्जाची रक्कम $8 अब्ज पर्यंत वाढ करण्यास सहमती दर्शविली आहे.

Advertisement

एक्स्प्रेस ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पाकिस्तानचे (Pakistan) नवे अर्थमंत्री आणि IMF चे उपव्यवस्थापकीय संचालक यांच्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर हा करार केला आहे. आयएमएफने मान्य केले आहे, की हा कार्यक्रम सप्टेंबर 2022 अखेरपासून आणखी नऊ महिने ते एक वर्ष वाढ केला जाईल, तर कर्जाचा (Loan) आकार सध्याच्या $6 बिलियन वरून $8 अब्ज पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल.

Advertisement

कंगाल पाकिस्तानचे टेन्शन होणार कमी.. या संघटनेने कर्जाबाबत घेतलाय मोठा निर्णय; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply