दिल्ली : युक्रेन विरोधात सुरू असलेल्या युद्धा दरम्यान (Russia Ukraine War) रशियानेही आपले इरादे जगाला सांगितले आहेत. रशियन सैन्याच्या जनरलने स्पष्टपणे सांगितले आहे, की दक्षिण युक्रेनवर कब्जा करणे हे त्यांचे लक्ष्य आहे. रशियन सैन्याच्या जनरलच्या या विधानाने रशियाला युक्रेनचा भूभाग ताब्यात घ्यायचा नाही असे आधीचे सर्व वक्तव्ये खोटे होते, हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रशियन सैन्याने खार्किव प्रदेशातील एक मोठा शस्त्रसाठा ताब्यात घेतल्याचेही वृत्त मिळाले आहे. येथे हजारो टन दारूगोळा आणि शस्त्रे आहेत.
त्याचवेळी हे युद्ध थांबवण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्राचे (United Nations) महासचिव अँटोनिया गुटेरेस मॉस्कोला भेट देणार आहेत. रशियन सैन्याच्या वतीने असे सांगण्यात आले आहे, की त्यांनी डॉनबाससह जवळजवळ संपूर्ण दक्षिण युक्रेन ताब्यात घेतला आहे आणि आता ते दक्षिणेकडे मोल्दोव्हाच्या दिशेने जात आहेत. रशियाच्या म्हणण्यानुसार, लष्कराने युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याचे लक्ष्य गाठले आहे.
रशियाने पूर्वनिश्चित उद्दिष्ट साध्य केले आहे, असेही लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. रशियन सैन्याचे सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्ट कमांडर रुस्तम मिन्कीव्ह म्हणाले, की आता ते क्रिमिया आणि युक्रेनच्या जिंकलेल्या भागा दरम्यान कॉरिडॉर तयार करण्याची खात्री करतील. वार्षिक सभेत त्यांनी ही माहिती दिली. रशियाच्या बॉर्डरवरील संकटात वाढ करण्याचे काम नाटोने केल्याचेही रशियाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ब्रिटनने (Britain) भारताला लढाऊ विमाने बनवण्यासाठीही मदत करणार असल्याचे म्हटले आहे. त्याच बरोबर, ब्रिटेन हिंद महासागरातील धोके ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानासाठी भारताच्या (India) गरजांना समर्थन देण्याचा प्रयत्न करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन यांनी भारत-ब्रिटेन संरक्षण भागीदारीचा विस्तार करण्यास सहमती दर्शवली आणि 2022 च्या अखेरीस मुक्त व्यापार करार (FTA) ला अंतिम रूप देण्याची योजना जाहीर केली. मोदी म्हणाले की, दोन्ही देशांचे संघ मुक्त व्यापार करारावर काम करत आहेत. वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत आणि आम्ही या वर्षाच्या अखेरीस एफटीए समाप्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. जॉन्सन म्हणाले की, आम्ही आमच्या संवादकांना ऑक्टोबरमध्ये दिवाळीपर्यंत एफटीए पूर्ण करण्यास सांगत आहोत.
रशियाला वेगळा करण्याचा ब्रिटेनचा प्लान.. भारताच्या मदतीसाठी केल्या मोठ्या घोषणा; जाणून घ्या..