Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पुतीनने दिले संकेत ‘या’ दिवशी संपणार रशिया-युक्रेन युद्ध?; जाणून घ्या काय आहे कारण

दिल्ली –  रशिया-युक्रेन युद्ध (Russia And Ukraine War) कधी संपणार? हा प्रश्न जगाला पडला आहे.  कारण पुढच्या महिन्यात म्हणजे 9 मे रोजी रशियाचा वार्षिक विजय दिवस आहे आणि मॉस्कोच्या रेड स्क्वेअरवर त्याची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षी विजय दिनानिमित्त रशियाचे अध्यक्ष पुतिन (Putin) आपल्या देशातील जनतेला संबोधित करतात. अशा स्थितीत डॉनबासमध्ये मिळालेल्या यशाचा उपयोग पुतिन आपल्या भाषणात युक्रेनवर निर्णायक विजयाची घोषणा म्हणून करू शकतात, असे मानले जात आहे.

Advertisement

गुरुवारी खुद्द पुतीन यांनीच त्यांच्या संरक्षणमंत्र्यांना अशा काही सूचना दिल्या की ते युद्ध संपवण्याचा निर्णय घेत असल्याचे दिसते. इंग्लंडच्या डिफेन्स इंटेलिजन्सकडून विजय दिनाच्या परेडच्या घोषणेबाबतही भीती व्यक्त केली जात आहे. खरं तर, पुतिन यांनी त्यांच्या संरक्षण मंत्र्यांना मारियुपोल शहराच्या बाहेरील अजोवास्टल स्टील प्लांटमध्ये युक्रेनियन सैन्याबरोबरची लढाई संपवण्याचे आदेश दिले. अझोवास्टल प्लांटमध्ये लपलेल्या युक्रेनियन सैनिकांना आत्मसमर्पण आणि जीवनाची हमी देण्याच्या सूचना संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी देखील दिल्या.

Advertisement

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मन सैन्यावर झालेल्या निर्णायक विजयाचा रशिया दरवर्षी 9 मे हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करत आहे. रशियाची राजधानी मॉस्कोची ओळख असलेल्या रेड स्क्वेअरवर मागील वर्षांप्रमाणे या वर्षीही भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान सैन्याची शस्त्रे आणि लष्करी उपकरणांची परेड आयोजित केली जाते. पुतिन यांनी रेड स्क्वेअर येथे सशस्त्र सलामी दिली तसेच व्हिक्ट्री पार्क येथे शहीदांना श्रद्धांजली वाहिली. अशा परिस्थितीत गेल्या 50-55 दिवसांपासून युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात हा विजय दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

पुतीन यांच्या संरक्षणमंत्र्यांना सूचना

Advertisement

पुतिन यांनी त्यांच्या संरक्षणमंत्र्यांना दिलेल्या सूचनांवरून असे दिसून येते की त्यांना आता सैनिकांना मरू द्यायचे नाही. कारण बहुतेक डोनेस्तक आणि लुहान्स्क (लुगांस्क) देश, दोन्ही डॉनबासचे ‘स्वतंत्र’ देश घोषित केले गेले आहेत, ते रशियन समर्थित मिलिशिया म्हणजेच बंडखोरांनी ताब्यात घेतले आहेत. गुरुवारी, इंग्लंडच्या संरक्षण गुप्तचरांनी सांगितले की रशियाचे सैन्य आता डोनबास क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित करणार आहे जेणेकरून पुतिन विजय दिवसाच्या परेड दरम्यान मोठी घोषणा करू शकतील. डिफेन्स इंटेलिजन्सनुसार, रशियन सैन्याला आता येथे हवाई मदतही मिळत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply