बाब्बो.. भारताने ‘या’ देशाला पु्न्हा दिलेत तब्बल 50 कोटी डॉलर; पहा, चीनच्या कृपेने कोणते संकट आलेय..
दिल्ली – श्रीलंकेतील आतापर्यंतच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाच्या काळात भारत पुन्हा एकदा मदत करण्यासाठी समोर आला आहे. विदेशी कर्जाच्या (Loan) विळख्यात अडकलेल्या श्रीलंकेला भारताने पुन्हा एकदा 50 कोटी डॉलरची मदत जाहीर केली आहे. याशिवाय भारताने सुमारे 2 कोटी डॉलर क्रेडिट लाइन (Credit Line) देखील दिली आहे. ज्याद्वारे श्रीलंका अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करत आहे.
सध्याची $50 कोटी मदत यापेक्षा वेगळी आहे. भारताने ही मदत श्रीलंकेला तेल खरेदीसाठी (Oil Purchase) दिली आहे. श्रीलंकेत तेलाची प्रचंड टंचाई आहे. तिथे पेट्रोल (Petrol) 350 रुपयांच्या आसपास मिळत आहे. एचटी न्यूजनुसार, श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की IMF कडून मदत येण्यास सहा महिने लागतील आणि ही रक्कम हप्त्याने मिळेल. या कालावधीत, आम्हाला आमच्या लोकांपर्यंत अत्यावश्यक वस्तू पोहोच करण्यासाठी विशेष निधीची आवश्यकता असेल, जी भारत देत आहे.
भारताने तेल खरेदीसाठी दुसऱ्यांदा $50 कोटी डॉलर (Dollar) मदत दिली आहे. यामुळे श्रीलंकेची आर्थिक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, भारताने पहिली क्रेडिट लाइन म्हणून 1.20 लाख टन डिझेल आणि 40 हजार टन पेट्रोलची खेप पाठवली होती. आतापर्यंत भारताने श्रीलंकेला सुमारे $2 कोटी डॉलर क्रेडिट लाइन दिली आहे. यासह श्रीलंका तांदूळ, औषधे (Medicines) आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करत आहे. भारत गेल्या दोन दशकांपासून विकसनशील देशांना क्रेडिट लाइनच्या स्वरूपात मदत करत आहे. लाभार्थी देश कधीही क्रेडिट लाइनची रक्कम काढू शकतो. त्यासाठी 75 टक्के खरेदी भारतातून करावी लागते.
श्रीलंकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे एकेकाळी भारताकडे दुर्लक्ष देऊन चीनचे (China) समर्थक होते, पण आज तोच भारत श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात मदत करत आहे. श्रीलंकेला यावर्षी $8 बिलियन डॉलरचे कर्ज हप्त्यांमध्ये भरावे लागणार आहे. परंतु त्यांच्याकडे एक अब्ज डॉलरपेक्षा कमी शिल्लक आहेत. जर श्रीलंकेने ही रक्कम भरली नाही तर ते दिवाळखोर होईल. श्रीलंकेला IMF कडून सुमारे $4 अब्जांचे बेलआउट पॅकेज मिळण्याची अपेक्षा आहे.
चिन्यांचा खतरनाक खेळ..! फक्त श्रीलंकाच नाही तर तब्बल ‘इतके’ देश अडकलेत ‘त्या’ सापळ्यात..