Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Sweden Riots Quran: म्हणून स्वीडनमध्येही धार्मिक दंगल; पहा नेमके काय कारण घडले आहे तिथे

Please wait..

रियाध/हेलसिंकी : युरोपीय देश स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या घटनेनंतर मागील ४ दिवसांपासून मोठा गदारोळ सुरू आहे. स्वीडनच्या अनेक शहरांमध्ये दंगली उसळल्या आहेत. मुस्लिमांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण जाळण्याची घटना एका उजव्या विचारसरणीच्या इस्लामविरोधी गटाने घडवून आणली आहे. या संघटनेने भविष्यात कुराण जाळण्याची घटना घडवून आणणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या घटनेमुळे मुस्लिम देशांचा नेता सौदी अरेबिया हाही देश संतापला आहे. (Saudi Arabia Condemns Burning Of Holy Quran By Far Right Group In Sweden Riots In Swedish Cities)

Advertisement

Advertisement
Loading...

स्वीडनमध्ये गेल्या ४ दिवसांपासून सुरू असलेल्या दंगलीमुळे अनेक शहरांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. रासमुस पालुदान  (Rasmus Paludan) हा डेनिस-स्वीडिश अतिरेकी जो Straum Kurs किंवा कट्टरपंथी संघटनेचे नेतृत्व करतो, त्याने घोषित केले आहे की त्याने कुराण जाळले आहे आणि ते पुढेही असेच करत राहतील. स्वीडनच्या नॉर्कोपिंग शहरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन दंगलखोर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांनाही गुन्ह्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. एकूणच धार्मिक विरोधाच्या नादात दुसऱ्या धर्मीय किंवा विचारांच्या नागरिकांना चिथावणी देऊन राजकारण करण्याचा खेळ फक्त भारत किंवा पाकिस्तान या देशात नाही तर सध्या सगळीकडे जोमात आहे. त्यामुळे सामान्य विचारी नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Advertisement

Advertisement

दरम्यान, सौदी अरेबियाने स्वीडनमध्ये मुद्दाम कुराण जाळणे आणि मुस्लिमांविरोधात चिथावणी दिल्याची जोरदार टीका केली आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने संवादाचे महत्त्व, सहिष्णुता आणि शांततापूर्ण सहजीवनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज यावर भर दिला. सौदी अरेबियाने म्हटले आहे की सर्व धर्म आणि देवस्थानांचा अपमान थांबला पाहिजे. स्वीडनच्या अनेक शहरांमध्ये उजव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांच्या निदर्शनांपूर्वी त्याचे विरोधक आणि पोलिस यांच्यात चकमक उडाली आहे. स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन यांनी या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला. गेल्या काही दिवसांपासून पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार हाणामारी सुरू आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले असून वाहने जाळली आहेत. रासमुस पालुदान यांनी निदर्शने केली तेव्हा गुरुवारी हिंसाचार सुरू झाला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply