बाब्बो.. जगातील ‘इतक्या’ लोकांना होतोय डोकेदुखीचा त्रास; जाणून घ्या काय म्हटलेय संशोधनात..
अहमदनगर : जगातील 52 टक्क्यांहून अधिक लोकांना दरवर्षी डोकेदुखीचा (Headache) त्रास होतो. त्यापैकी 14 टक्के मायग्रेन असतात. नुकत्याच झालेल्या संशोधनातून असेही समोर आले आहे की पुरुषांपेक्षा महिलांना डोकेदुखीचा त्रास जास्त असतो. नॉर्वेच्या (Norway) युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांच्या संशोधन अहवालानुसार, जगभरात 20 ते 65 वर्षे वयोगटात डोकेदुखीची समस्या अधिक आढळते. 1961 ते 2020 दरम्यान प्रकाशित झालेल्या अहवालांच्या आधारे संशोधकांनी डोकेदुखीच्या समस्येचे मूल्यांकन केले.
त्यांच्या पुनरावलोकन अहवालात असे नमूद केले आहे, की सुमारे 26 टक्के लोकांना तणाव-संबंधित डोकेदुखीचा त्रास होतो आणि 4.6 टक्के लोकांना दर महिन्याला 15 किंवा त्याहून अधिक दिवस डोकेदुखी होत असल्याचे सांगितले आहे. संशोधनात असेही दिसून आले की सुमारे 15.8 टक्के लोकांना कधीतरी डोकेदुखीचा अनुभव आला आणि यापैकी सुमारे 50 टक्के लोकांनी मायग्रेनची तक्रार केली.
संशोधन अहवालाचे प्रमुख लेखक, लार्स जेकोब सोव्हनर यांनी सांगितले की, डोकेदुखीची समस्या जगभरात सामान्य आहे आणि तिचे विविध प्रकार अनेकांना प्रभावित करतात. डोकेदुखी टाळण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी अधिक चांगले मार्ग शोधण्याची गरज आहे. संशोधनात असे म्हटले आहे, की महिलांना डोकेदुखीचा त्रास जास्त होतो.
दरम्यान, जगभरात सध्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षांनंतरही कोरोनाचे संकट (Corona Virus) कायम आहे. कोरोना बरोबरच दुसऱ्या आजारांनाही डोके वर काढले आहे. दुसरीकडे पर्यावरणाच्याही (Environment) समस्या निर्माण होत आहेत. त्याचाही परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. वायू प्रदूषणाचे (Air Pollution) प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे माणसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.
बाब्बो… प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे वाढतो लठ्ठपणाचा धोका… जाणून घ्या काय म्हटले संशोधनात