युक्रेनला अमेरिकेची मदत; भडकलेल्या रशियाने दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; पहा, काय घडतेय युद्धाच्या मैदानात..
दिल्ली : अमेरिकेच्या जो बायडेन (Jo Biden) प्रशासनाने युक्रेनला (Ukraine) अतिरिक्त 80 कोटी डॉलर्सची लष्करी मदत जाहीर केल्यानंतर रशिया (Russia) चांगलाच भडकला आहे. रशियाने धमकी देत म्हटले आहे, की या प्रकाराचे अनपेक्षित असे परिणाम होतील. अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे देण्याचे अभियान तत्काळ थांबवावे, असेही रशियाने अमेरिकेला म्हटले आहे.
वॉशिंग्टन पोस्टने (Washington Post) या आठवड्यात रशियाने अमेरिकेला पाठवलेल्या राजनैतिक नोटचे पुनरावलोकन केले. या नोटमध्ये अमेरिका आणि नाटोला (NATO) इशारा देण्यात आला आहे. अमेरिका आणि नाटो देशांनी युक्रेनला संवेदनशील शस्त्रास्त्र प्रणालींचा पुरवठा (Supply) त्वरित थांबवावा, असे त्यात म्हटले आहे. तसे न झाल्यास त्याचे अनपेक्षित परिणाम होतील, असा धोक्याचा इशाराही रशियाने अमेरिकेला दिला आहे. आम्ही अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना युक्रेनचे बेजबाबदार सैन्यीकरण थांबवण्याचे आवाहन करतो. तसे करण्यात अयशस्वी झाल्यास प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर अनपेक्षित परिणाम होतील,” असे नोटमध्ये म्हटले आहे. अमेरिकन लष्करी मदत पॅकेजमध्ये अनेक लष्करी साहित्याचा समावेश आहे.
दरम्यान, याआधी रशियाने उत्तर युरोपातील देशांना कोणत्याही अनावश्यक कामात सहभागी होण्यापासून दूर राहण्यास सांगितले होते. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रशासनाने या संदर्भात स्वीडन आणि एका देशास नाटोमध्ये सामील होण्याविरुद्ध इशारा दिला होता. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धा दरम्यान (रशिया-युक्रेन युद्ध) आता युरोपातील काही देशांनी त्यांच्या सीमांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाश्चात्य देशांच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार स्वीडन शक्य तितक्या लवकर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) मध्ये सामील होऊ इच्छित आहे.
वास्तविक, गेल्या आठवड्यात या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्या दीर्घ बैठकीनंतर हे दोन्ही देश त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. रशियाच्या एका खासदाने म्हटले होते की, याचा अर्थ काही ठिकाणी विनाश होईल. पेस्कोव्ह म्हणाले, की “आम्ही वारंवार सांगितले आहे की आघाडी संघर्षाच्या दिशेने एक साधन आहे आणि त्याचा पुढील विस्तार युरोपियन प्रदेशात स्थिरता आणणार नाही.”
Russia Ukraine War : आता युक्रेननेही रशियावर केली मोठी कारवाई; रशियाला ‘तसा’ बसणार फटका..