Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनवर अमेरिकेचा मोठा आरोप..! कर्जाच्या नावाखाली चीनने केलाय वेगळाच प्रकार; जाणून घ्या..

दिल्ली : चीनवर जगभरातून टीका होत आहे. कर्ज प्लानच्या माध्यमातून विकसनशील देशांना चीनवर अवलंबून राहण्यास भाग पाडल्याचा आरोप अमेरिकेने (America) केला आहे. गेल्या दशकात चीनने अनेक देशांना कर्ज दिले आहे. अलीकडच्या काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर चीनच्या (China) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपेक्षा जास्त कर्ज (Loan) दिले आहे.

Advertisement

चीनने कर्जाच्या अटीही अशा केल्या आहेत की विकसनशील देशांना त्यांचे पालन करणे कठीण जाते. ताजे प्रकरण श्रीलंकेचे (Sri lanka) आहे जिथे आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. आता श्रीलंका चीनकडून आणखी कर्ज मागत असताना चीनने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. श्रीलंकेने चीनकडे 2.5 अब्ज डॉलर्सची मदत मागितली होती, ज्याला चीनने प्रतिसाद दिलेला नाही.

Advertisement

आंतरराष्ट्रीय आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे की, कोरोनानंतर रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे (Russia Ukraine War) जगातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यांनी चीनला मदतीचे आवाहनही केले आहे. पाकिस्तानने 4 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मागणी केली होती. चीनचे जिनपिंग सरकार श्रीलंकेतील आणीबाणी आणि पाकिस्तानमधील नवीन सरकारनंतरच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. राष्ट्रपतींच्या राजीनाम्यासाठी श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर निदर्शने होत आहेत. अशा परिस्थितीत चीनकडून आर्थिक मदत मिळेल की नाही, याबाबत संभ्रम आहे. तथापि, पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही देशांना अपेक्षा आहे की चीन लवकरच मदत कर्ज देऊ शकेल.

Loading...
Advertisement

कोरोनाचे (Corona) संकट चीनसाठी त्रासदायक ठरले आहे. चीनच्या सरकारी बँकांच्याही लक्षात आले की, जे देश कर्ज घेत आहेत, ते कर्ज परत करण्याची त्यांची क्षमता नाही. त्या देशांतील परिस्थिती सातत्याने खालावत चालली आहे. अशा वेळी चीनने कोरोनाचा सामना करण्यासाठी स्वतःवर पैसा खर्च करण्याचे पाऊल उचलले. आता चीन अशा देशांना कर्ज देण्याचे टाळू इच्छितो ज्यांच्याकडून कर्जाची परतफेड होण्याची शक्यता नाही. कोरोनामुळे चीनचा तंत्रज्ञान व्यवसाय आणि अनेक देशांच्या गुंतवणुकीवरही वाईट परिणाम झाला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांचे आर्थिक कामकाज बंद केले होते.

Advertisement

पाकिस्तानचे नवे पंतप्रधानही करणारा चीनचा दौरा.. पहा, काय आहे महत्वाचे कारण..

Advertisement

चीनमध्ये सुरू आहे कोरोनाचे थैमान; भारताने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; जाणून घ्या कोरोना अपडेट

Advertisement
Advertisement

Leave a Reply