Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

इम्रान खान यांचा नवा राजकीय प्लान; ‘त्यामुळे’ सर्वच खासदार देणारे राजीनामे; पहा, काय सुरू आहे राजकारण..

दिल्ली : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता इम्रान खान (Imran Khan) यांनी नवीन प्लान तयार केला आहे. या रणनितीअंतर्गत इम्रान खान यांनी संसदेत चोरांबरोबर बसणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याबरोबर पीटीआयचे 125 खासदार पदाचा राजीनामा (Resignation) देणार आहेत. इतकेच नाही तर इम्रान खान यांच्यानंतर पंजाब, सिंध आणि बलुचिस्तानच्या राज्यपालांनीही राजीनामे देण्याची घोषणा केली आहे. खैबर पख्तूनिस्तानचे गव्हर्नर (Governor) यांनीही राजीनामा दिला आहे.

Advertisement

रविवारी पेशावर, कराची, लाहोर, रावळपिंडीसह सर्व प्रमुख शहरांमध्ये इम्रान खान यांच्या समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. खान यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. लष्कराच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळे इम्रान यांना राजीनामा द्यावा लागल्याचे मानले जात आहे. मात्र, पाकिस्तानच्या सैन्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Advertisement

माजी पंतप्रधान इम्रान खान यांना संपूर्ण राजकीय संघर्ष करायचा आहे. यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची तयारी केली आहे. तसेच आगामी निवडणुकीसाठी पक्ष बळकट करायचा आहे. या रणनितीनुसार त्यांच्या समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत इम्रान खान यांच्या पाठीशी उभे राहू, असे खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, पाकिस्तानच्या नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ याआधी म्हणाले होते, की आम्हाला भारताबरोबर (India) चांगले संबंध हवे आहेत, पण काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय शांतता राखता येणार नाही. काश्मिरींसाठी आम्ही प्रत्येक मंचावर आवाज उठवू. राजनैतिक पातळीवर काम करेल. त्यांना पाठिंबा देणार आहोत. ते आमचे लोक आहेत. मी पंतप्रधान मोदींना सांगेन, की तुम्ही समजून घ्या की दोन्ही बाजूला गरिबी आहे, बेरोजगारी आहे. आपण आपले आणि आपल्या भावी पिढ्यांचे नुकसान का करू इच्छितो ? काश्मिरींच्या आकांक्षेनुसार काश्मीर प्रश्नाचा निर्णय घेऊ.

Advertisement

पाकिस्तानातील बाकीच्या नेत्यांप्रमाणे शाहबाज शरीफही चीनचे (China) कौतुक करताना दिसले. शरीफ म्हणाले, की चीन पाकिस्तानच्या (Pakistan) सुख-दुःखाचा भागीदार आहे आणि त्याने प्रत्येक वेळी पाकिस्तानला साथ दिली आहे. इतकेच नाही तर कोणीही काहीही करू शकत नाही, पण चीनकडून आमची मैत्री हिरावून घेता येणार नाही आणि ही मैत्री शेवटपर्यंत कायम राहील, असेही शाहबाज शरीफ म्हणाले. चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांचा संदर्भ देत शाहबाज शरीफ म्हणाले की, आम्ही जिनपिंग यांचे आभारी आहोत आणि आम्ही सीपीइसी (China Pakistan Economic Corridor) प्रकल्पावर आता आधिक वेगाने काम करू.

Advertisement

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचे काश्मीरबाबत मोठे वक्तव्य; चीनचे केले कौतुक; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply