Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोण होणार पाकिस्तानचा नवा पंतप्रधान ? ; विरोधकांकडून ‘या’ उमेदवाराचे नाव फायनल; जाणून घ्या..

दिल्ली : पाकिस्तानमध्ये (Pakistan) सुरू असलेला राजकीय गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. तिकडे सोमवारी पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांची देशाचे 23 वे पंतप्रधान म्हणून निवड होणे जवळपास निश्चित झाले आहे. लवकरच त्याची घोषणाही केली जाईल. अधिकृतपणे निवड झाल्यानंतर शपथविधी सोहळा होईल. त्यांच्या मंत्रिमंडळात अनेक पक्षांचे प्रतिनिधित्व पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

अविश्वास ठरावाद्वारे पंतप्रधान पदावरुन हटवण्यात आलेले इम्रान खान (Imran Khan) कमालीचे संतापले आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने (Dawn) दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी शाहबाज शरीफ आणि पीएमएल-एन नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह कुरेशी यांनीही पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी समर्थकांना रस्त्यावर उतरून नव्या सरकारला विरोध करण्यास सांगितले आहे. इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाचे नेते सातत्याने सांगत आहेत की, त्यांचे सरकार पाडण्यासाठी विरोधकांना विदेशी शक्तींचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. रविवारीही कराची, पेशावर आणि लाहोरसह देशातील इतर शहरांमध्ये पीटीआय समर्थकांनी इम्रान खान यांना सत्तेवरून हटवल्याच्या विरोधात निदर्शने केली. याआधी शनिवारी संसदे बाहेरही अशीच निदर्शने झाली होती. आंदोलकांच्या हातात इम्रान खान यांच्या पक्षाचे झेंडे, बॅनर आणि पोस्टर्स होते.

Loading...
Advertisement

एएनआयच्या वृत्तानुसार, इम्रान खान म्हणतात की, त्यांना पंतप्रधान पदावरुन बाजूला केल्यानंतर देशाला पुन्हा एकदा स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागेल. इम्रान सरकारमधील माजी मंत्री फवाद चौधरी यांनीही लोकांना रस्त्यावर उतरून नव्या सरकारचा निषेध करण्यास सांगितले आहे. डॉनच्या म्हणण्यानुसार, देशाच्या इतिहासात अशा प्रकारचा निषेध पहिल्यांदाच पाहिल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते ही लाखोंची संख्या परकीय सत्तेने उभारलेले सरकार देश खपवून घेणार नाही याची साक्षीदार आहे.

Advertisement

पाकिस्तानमध्ये आज महत्वाची घडामोड; पहा, पंतप्रधान इम्रान खान राजीनामा देणार का..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply