आधी चीन.. आता रशिया..! युरोपातील ‘या’ लहान देशाने केलाय मोठाच कारनामा; पहा, रशियाला कसा दिलाय धक्का..
दिल्ली : रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारले आहे. आज 40 दिवसांनंतरही युद्ध थांबलेले नाही. या काळात रशियाने युक्रेनचे अतोनात नुकसान केले आहे. तर दुसरीकडे रशियाचेही मोठे नुकसान होत आहे. रशियाच्या या कृत्यामुळे जगातील अनेक देशांनी रशियावर अत्यंत कठोर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. या निर्बंधांचा फटका रशियाला बसत आहे. रशियावर रोजच नवीन निर्बंध टाकले जात असल्याने आजमितीस रशिया हा जगातील सर्वाधिक निर्बंधांचा सामना करणारा देश ठरला आहे.
आता रशियाला आणखी एक धक्का बसला आहे. युरोपातील लहान देश लिथुआनियाने आक्रमक पवित्रा घेत रशियाच्या राजदूतास तत्काळ देशातून निघून जाण्याचा आदेश दिला आहे. येथील कार्यालय तत्काळ बंद करावे, असे लिथुआनिया सरकारने म्हटले आहे. लिथुआनियाने याआधी चीनलाही असाच झटका दिला होता. या देशाने चीनच्या विरोधाचा विचार न करता तैवानला आपल्या देशात कार्यालय सुरू करण्याची परवानगी दिली होती. लिथुआनियाच्या विदेश मंत्रालयाने माहिती दिली, की रशियाच्या राजदूतास तत्काळ देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, रशियाच्या या कृत्यामुळे जगातील अनेक कंपन्यांनी रशियामध्ये आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही कंपन्यांनी आर्थिक निर्बंध टाकले आहेत. फेरारी आणि लॅम्बोर्गिनीसह इतर अनेक कंपन्यांनी रशियामधील त्यांचे व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली. L’Oreal ने रशियामधील ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोअर्स तात्पुरते बंद करण्याची घोषणा केली होती. याशिवाय युनिलिव्हरने रशियाला उत्पादनांची निर्यात आणि आयात स्थगित करण्याची घोषणाही केली होती.
आता तर अमेरिकेने रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करण्यावरही बंदी घातली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. या निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्के बसत आहेत. या निर्बंधांतून मार्ग काढण्यासाठी रशियन सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता रशियाच्या अडचणी वाढणार हे मात्र नक्की आहे.
अर्र.. अमेरिकेलाच सुरू ठेवायचेय युद्ध..! रशियाच्या विरोधात युक्रेनला देणारी ‘ही’ मदत; जाणून घ्या..