बाब्बो.. कोरोनाने चीनही हादरला..! ‘या’ शहरातील अडीच कोटी लोकांची होणार तपासणी सुरू; सैन्याची घेतलीय मदत..
दिल्ली : चीनचे प्रमुख व्यापारी शहर शांघायमध्ये (Shanghai) कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रविवारी येथे 8 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. त्यामुळे चीन सरकार हादरले आहे. सरकारने तातडीने हालचाली करत आजपासून तपासणीची मोठी मोहीम सुरू केली आहे. तपासासाठी लष्कराचे जवान आणि डॉक्टर मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत.
सोमवारी, शांघाय शहरातील 2.6 कोटी लोकांच्या तपासणीची सर्वात मोठी मोहीम सुरू झाली. अनेकांना त्यांच्या निवासी परिसरात तपासणी करण्यास सांगितले होते. त्याच वेळी, लोक अगदी सकाळीच अनेक चाचणी केंद्रांवर रांगेत उभे असलेले दिसले. चीनचे लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या 2000 पेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रविवारी शांघाय येथे कोरोना तपासणीत नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी पाठवण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार जिआंगसू, जिजियांग आणि बीजिंगसह अनेक प्रांतातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही तेथे पाठवण्यात आले आहेत. अशाप्रकारे 10 हजारांहून अधिक लोकांचे पथक तपास मोहिमेत सहभागी आहे.
2020 च्या सुरुवातीला जेव्हा चीनच्या वुहान शहरात पहिल्यांदा कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला तेव्हा तिथेही अशाच प्रकारची व्यापक तपासणी सुरू करण्यात आली होती. तेथे पीएलएने 4000 वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम तपासासाठी पाठवली होती. शांघायला पाठवलेला संघ त्यापेक्षा मोठा आहे. यामध्ये पीएलएच्या तिन्ही युनिट्समधील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
गेल्या सोमवारी शांघायमध्ये दोन टप्प्यातील लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले. यामध्ये सर्व लोकांना त्यांच्या घरात राहण्यास सांगण्यात आले आहे. रविवारी येथे 8,581 लक्षणे नसलेले आणि 425 लक्षणे असलेले रुग्ण आढळले. नागरिकांनाही त्यांच्या पातळीवर अँटीजेन चाचणी करण्यास सांगितले आहे. जागतिक निकषांनुसार, शांघायमध्ये कोरानाची लाट फार वेगवान नाही, परंतु चीन कोरोना चाचणी, ट्रेसिंग आणि क्वारंटाइनची पावले उचलून साथीच्या रोगावर ज्या पद्धतीने नियंत्रण करतो त्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. चीनमध्ये क्वारंटाइनचे नियम अत्यंत कठोर आहेत, ज्या अंतर्गत सर्व संक्रमित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना इतर लोकांपासून वेगळे केले जाते.
विलगीकरण केंद्रांमध्ये जास्त गर्दी, स्वच्छतेचा अभाव आणि अन्न व अत्यावश्यक औषधांचा अभाव यामुळे तेथे पाठवलेल्या रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी साथीच्या रोगावर तातडीने आणि कठोरपणे नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
युद्ध तर होतेच, आता चीनचा कोरोनाही आलाय..! पहा, जागतिक बाजारात कच्च्या तेलाला ‘कशाचा’ बसलाय झटका..