Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानच्या राजकारणात आज महत्वाचा दिवस; ‘त्या’ मुद्द्यावर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; जाणून घ्या..

दिल्ली : पाकिस्तानच्या राजकारणात सध्या अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्यावरुन वादळ उठले आहे. सरकार विरोधातील या प्रस्तावावर आज चर्चा होणार आहे. त्यामुळे देशाचे सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. विरोधी पक्षांनी तर सरकार पाडण्याची पूर्ण तयारीच केली आहे. यामध्ये त्यांना पाकिस्तानी सेना सुद्धा सहकार्य करत आहे. त्यामुळे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज 31 मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेत इम्रान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यानंतर 3 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदाना दरम्यान इम्रान खान पाकिस्तानमध्ये पंतप्रधानपदी राहणार की त्यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट होईल.

Advertisement

बुधवारी सिंध हाऊसमध्ये विरोधी पक्षांनी बैठक घेऊन रणनिती आखली. विशेष म्हणजे, या बैठकीला इम्रान यांच्या पक्षातील सर्व नाराज खासदारांसह 196 सदस्य उपस्थित होते. पाकिस्तानच्या संसदेचे 342 सदस्य आहेत. बहुमतासाठी 172 सदस्यांची आवश्यकता असते. सहकारी पक्ष विरोधात गेल्याने इम्रान यांना सध्या 164 सदस्यांचा पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे बहुमत गेले आहे. अशा परिस्थितीत राजकीय घडामोडी आधिक वेगाने घडू लागल्या आहेत.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणी आता चीननेही हस्तक्षेप सुरू केल्याचे दिसत आहे. या मुद्द्यावर चीनने प्रतिक्रिया देत थेट अमेरिकेवर गंभीर आरोप केला आहे. पाकिस्तानामधील सरकार अस्थिर करण्यामागे अमेरिकेचा हात असेल, तर चीन पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहील, असे चीनने स्पष्ट केले आहे. देशातील या सध्याच्या राजकारणात पाकिस्तानच्या लष्कराचा मोठा हात असल्याचे मानले जाते. 2018 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान बनलेल्या इम्रान खान यांना पाकिस्तानी सैन्याकडून फारसे महत्व मिळत नाही. त्यामुळे त्यांना आता पंतप्रधान पदावरुन काढून टाकण्याचा प्लान पाकिस्तानी सैन्याने तयार केल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading...
Advertisement

पाकिस्तानमध्ये मोठं राजकीय संकट..! आज राजकारणात घडणार मोठ्या घडामोडी.. जाणून घ्या, डिटेल..

Advertisement

आणखी एका युद्धाचा जगाला ताप..! रशिया-युक्रेनचे युद्ध मिटत नसतानाच अमेरिका-इराण झालेत गरम..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply