Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : अमेरिका-युक्रेनचा रशियाच्या विरोधात नवा प्लान; पहा, काय आहे दोन देशांची रणनिती..

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 35 वा दिवस आहे. रशिया सातत्याने युक्रेनला लक्ष्य करत आहे. युक्रेनवर रशियाचे हमले युद्धाच्या 35 व्या दिवशीही सुरूच आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबरोबर विविध मुद्द्यांनर चर्चा केली.

Advertisement

झेलेन्स्की यांनी याबाबत एक ट्विट केले. त्यामध्ये म्हटले, की दोन्ही नेत्यांनी रशियाविरूद्ध वाढीव निर्बंधांबाबत नवीन रणनिती तसेच युक्रेनला आर्थिक आणि मानवतावादी मदत सहाय्य यावर देखील चर्चा केली. दुसरीकडे, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, तुर्कीमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चा व्यर्थ आहे. होय, युक्रेनच्या बाजूने चर्चेत काही लेखी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. ज्यांचा विचार करण्याची रशियाला विनंती करण्यात आली आहे. याशिवाय उभय देशांमधील वादाची स्थिती आधीसारखीच आहे. युद्ध बंदीच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही बाजूंना अजून बरेच काम करायचे आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत युक्रेनला तटस्थ राज्य बनवण्यावरही चर्चा झाली. मात्र यासाठी युक्रेनने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, तुर्की, चीन यांचा हमीदार गट स्थापन करण्याबाबत सांगितले गेले.

Advertisement

त्याचबरोबर युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात कोणत्याही निर्बंधाशिवाय मानवतावादी मदत देण्याचा आग्रह भारताने धरला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीबद्दल भारताला जास्त काळजी वाटते, जी अधिकच वाढत आहे. तिरुमूर्ती म्हणाले, की युक्रेनमधील प्रभावित लोकसंख्येच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्याची तातडीची गरज आहे. याशिवाय देशातील अनेक शहरांमध्ये आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी जी-7 देशांनी रशियाच्या सेंट्रल बँकेला व्यवहारात सोन्याचा वापर करण्यास बंदी घातली होती. युक्रेनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) मांडलेल्या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. युक्रेन संघर्षातून रशिया लष्करी आणि राजकीयदृष्ट्या कमकुवत होईल, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यावेळी म्हटले होते. जपान अतिरिक्त 25 रशियन व्यक्तींची मालमत्ता गोठवेल आणि 81 रशियन संस्थांच्या निर्यातीवर बंदी टाकेल, असे जपानी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले होते. तेल-गॅस उत्पादक देशांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वितरणात वाढ करण्याचे आवाहन करा. तेल आणि वायू उत्पादनात ओपेकची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन, G-7 नेत्यांनी तेल आणि वायू उत्पादक देशांना जबाबदारीने वागण्याचे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वितरणात वाढ करण्याचे आवाहन केले, G-7 नेत्यांनी एका निवेदनात म्हटले होते.

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना रशियाला G20 गटातून वगळावे का, असे विचारले असता ते म्हणाले की माझे उत्तर होय आहे आणि ते G20 वर अवलंबून आहे. ते म्हणाले, की जर इंडोनेशिया आणि इतर देश रशियाला काढून टाकण्यात सहमत नसतील तर युक्रेनला बैठकांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली पाहिजे असे त्यांचे मत आहे.

Advertisement

बाब्बो.. अमेरिका ‘त्यासाठी’ देणार पैसाच पैसा.. पहा, कोणाला रोखण्यासाठी अमेरिकेने केलाय प्लान..

Advertisement
Advertisement

Leave a Reply