Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनने केलीय भन्नाट आयडीया..! लॉकडाऊनमध्येही अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केला ‘हा’ खास प्लान; जाणून घ्या..

दिल्ली : संपूर्ण युरोपसह चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे आगमन झाले आहे. चीनमध्ये नवीन व्हेरिएंट दररोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे. वेगाने वाढणारी प्रकरणे पाहता येथील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. चीनची आर्थिक राजधानी शांघाय देखील लॉकडाऊनमध्ये आहे. मंगळवारी तर चीनमध्ये विक्रमी 4477 प्रकरणे आढळली आहेत. अशा परिस्थितीत एकामागून एक शहरात लॉकडाऊनचा चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू लागला आहे.

Advertisement

आर्थिक केंद्र असल्याने शांघायमधील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था कार्यालयातच करण्यात आली आहे. शांघायच्या एका जिल्ह्यात सुमारे 20,000 कर्मचारी, बँकर्स कार्यालयात राहत आहेत, अशी परिस्थिती आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असती. त्यामुळे लॉकडाऊन होण्याआधीच कर्मचाऱ्यांना येथील कार्यालयात येण्यास सांगितले होते. कोरोनामुळे शांघायमधील लुजियाजुई देखील लॉकडाऊनच्या विळख्यात आहे. येथे 20 हजारांहून अधिक लोक काम करत आहेत. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, लुजियाजुईमध्ये 285 ऑफिस टॉवर आहेत. याशिवाय अनेक बिगर आर्थिक संस्थाही येथे आहेत.

Advertisement

26 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शहराची रणनिती म्हणजे शांघाय शहराच्या पहिल्या सहामाहीत चार दिवसांचा लॉकडाउन टाकणे आणि नंतर शहराच्या इतर भागात चार दिवस निर्बंध टाकणे. संपूर्ण शहराची प्रभावी कोरोना विषाणू चाचणी करणे आणि आतापर्यंत सर्वात मोठा पसरलेला कोरोना नियंत्रणात आणणे हा या धोरणाचा उद्देश आहे. चीनमधील इतर अनेक शहरांमध्येही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, जगातील काही देशात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. यामध्ये युरोप आणि आशियातील काही देशांचा समावेश आहे. सध्या चीनमध्ये (China) कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. अगदी कठोर उपाययोजना करुन कोरोना आटोक्यात आणल्याचा दावा करणाऱ्या चीनला कोरोनाने हैराण केले आहे. काही दिवसांपासून येथे कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. एरव्ही दोन किंवा तीन रुग्ण सापडले तरी कठोर लॉकडाऊन (Lockdown) करणाऱ्या या देशात आता मार्चपासून अतिशय वेगाने कोरोना रुग्ण (Corona Patient) सापडले आहेत. सध्या देशातील परिस्थिती आधिक गंभीर आहे, असे येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Advertisement

बाब्बो.. आता कोरोनाने चीनला केलेय हैराण.. फक्त 25 दिवसांत सापडलेत ‘इतके’ रुग्ण; जाणून घ्या, Corona Update..

Advertisement
Advertisement

Leave a Reply