Russia-Ukraine War : युक्रेनच्या राष्ट्रांध्यक्षांचे महत्वाचे वक्तव्य.. म्हणाले, ‘त्यासाठी’ आता युक्रेन तयार
दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यात रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन 32 दिवस उलटले आहेत. सोमवार हा युद्धाचा 33 वा दिवस आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, की रशियाच्या सुरक्षेची हमी देण्यास तयार आहेत, तटस्थ राहतील आणि स्वतःला अण्वस्त्र मुक्त राज्य घोषित करतील. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.
आता तुर्कीमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होणार आहे. त्याआधी अध्यक्ष झेलेन्स्की यांनाी स्पष्ट शब्दात सांगितलले आहे की, पुतिन यांच्या अवास्तव मागण्यांपुढे ते झुकणार नाहीत. या चर्चेआधी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, जर रशियाने निशस्त्रीकरण आणि निशस्त्रीकरणाची चर्चा केली तर आम्ही चर्चा सुरू करणार नाही. या गोष्टी आमच्या आकलना पलीकडच्या आहेत.
युक्रेन अण्वस्त्र आणि जैविक शस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही रशियाने केला आहे. झेलेन्स्कीने ते नाकारले. ते म्हणाले, की आमच्याकडे अण्वस्त्रे नाहीत. आमच्याकडे जैविक प्रयोगशाळा आणि रासायनिक शस्त्रे नाहीत. युक्रेनमध्ये या गोष्टी नाहीत. झेलेन्स्कीच्या विधानांवरून असे देखील दिसते की युक्रेनियन सैन्य आता रशियन हमल्यांमुळे खचले आहे, शस्त्रास्त्रांची कमतरता आहे आणि शस्त्रांशिवाय कोणतेही सैन्य शत्रूशी स्पर्धा करू शकत नाही. अलीकडेच, राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की टँक, चिलखती वाहने आणि विशेषत: जेट्सशिवाय मारियुपोल शहराचे रक्षण करणे आता शक्य नाही.
शांतता चर्चा मंगळवारी (29 मार्च) सुरू होईल आणि बुधवारी (30 मार्च) संपेल. तुर्कीचे अध्यक्ष म्हणाले की, रशिया आणि युक्रेनने वाटाघाटी करणाऱ्या सहापैकी चार मुद्यांवर सहमती दर्शवली आहे. यात युक्रेन नाटोमध्ये सामील न होणे, युक्रेनमध्ये रशियन भाषेचा वापर, नि:शस्त्रीकरण आणि सुरक्षा हमी यांचा समावेश आहे. तथापि, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, रशियाबरोबर महत्त्वाच्या मुद्यांवर कोणताही करार झालेला नाही.