Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia-Ukraine War : रशियाचा अमेरिकेवर मोठा आरोप.. अमेरिका करतोय धक्कादायक कारवाया..

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध महिना उलटला तरीही सुरूच आहे. पुतिनचे सैन्य दिवसेंदिवस आक्रमक होत असताना झेलेन्स्कीही माघार घेण्यास तयार नाहीत. या युद्धात युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहे. तर रशियाच्याही अडचणी वाढल्या आहेत. अमेरिका आणि युरोपिय देश युक्रेनला मदत करत असल्याने युद्ध वाढले आहे. या माध्यमातून रशियावरील आर्थिक निर्बंध सतत वाढत आहेत. या निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला जबर झटके बसत आहेत. त्यामुळेही रशियाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत, रशिया अमेरिकेबरोबर चर्चा करण्यास तयार असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

रशियाने म्हटले आहे, की ते राजनयिक मोहिमेच्या मुद्द्यांवर अमेरिकेबरोबर सामान्य पातळीवर चर्चेसाठी तयार आहेत, परंतु अमेरिका रशियन मोहिमांमध्ये आणखी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी शनिवारी ही माहिती दिली. “आम्ही चर्चा किंवा संवादात व्यत्यय आणत नाही. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, परंतु अमेरिका या दिशेने सामान्य पातळीवरील संवादाकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की अमेरिका रशियन मोहिमांमध्ये आणखी अडचणी निर्माण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. त्यांनी अमेरिकेला अशा कृत्यांवर विचार करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

दरम्यान, युक्रेनमधील मानवतावादी संकटासाठी रशियाला जबाबदार धरणारा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेने मंजूर केला आहे. या ठरावात तात्काळ युद्धविराम आणि लाखो नागरिकांसह घरे, शाळा आणि रुग्णालये यांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. ठराव रशियाच्या आक्रमकतेच्या “गंभीर मानवतावादी परिणामांचा” निषेध करतो. या ठरावात म्हटले आहे की, गेल्या अनेक दशकांत जगाने युरोपमध्ये इतके मोठे मानवतावादी संकट पाहिले नाही.

Loading...
Advertisement

युक्रेनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) मांडलेल्या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. युक्रेनचा प्रस्ताव रशियाच्या हमल्यामुळे निर्माण झालेल्या मानवतावादी संकटाबाबत होता. या प्रस्तावाच्या बाजूने 140 तर विरोधात 5 मते पडली. त्याचवेळी भारतासह 38 सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही. युक्रेनमधील मानवतावादी संकटासाठी रशियाला जबाबदार धरणारा ठराव महासभेने मंजूर केला आणि तात्काळ युद्धबंदीची मागणी केली.

Advertisement

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला होणार फायदा..! गहू निर्यातीसाठी मोदी सरकारने केलाय ‘हा’ खास प्लान..

Advertisement

युक्रेनचा प्लान आहे तरी काय..? ; NATO संघटनेकडे मागितलीय ‘ही’ मोठी मदत.. पहा, कसे बदलतेय राजकारण..

Advertisement
Advertisement

Leave a Reply