Take a fresh look at your lifestyle.

युद्धाबाबत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे मोठे वक्तव्य.. ‘त्या’ मुद्द्यावर रशियाला स्पष्ट शब्दांत दिले उत्तर..

दिल्ली : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाला युद्ध संपवण्याचे आणि पुन्हा चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. परंतु त्यांनी असेही सांगितले, की युक्रेन आपला कोणताही प्रदेश सोडण्यास सहमत नाही. रशियन जनरल स्टाफचे उपप्रमुख कर्नल जनरल सर्गेई रुडस्कोई यांना प्रत्युत्तर म्हणून झेलेन्स्की यांनी आपल्या एका संदेशात हे वक्तव्य केले.

Advertisement

रुडस्कोई यांनी सांगितले होते, की रशियन सैन्याचे मुख्य ध्येय म्हणजे डॉनबासची प्रांत मुक्त करणे हे आहे आणि आम्ही यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. रशिया समर्थित फुटीरतावाद्यांनी 2014 पासून पूर्व युक्रेनच्या डोनबास प्रदेशाचा काही भाग नियंत्रित केला आहे. मारियुपोल शहरासह युक्रेनमधील अधिक जमिनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियन सैन्य लढत आहेत. झेलेन्स्की यांनी नमूद केले, की रशियन सैन्याने हजारो सैनिक गमावले आहेत परंतु तरीही ते कीव किंवा खार्किव ताब्यात घेऊ शकले नाहीत. रशियाचे युक्रेनवर आक्रमण सुरू होऊन एक महिना उलटला आहे. यावेळी रशियन सैन्याने युक्रेनमधील रुग्णालये, रुग्णवाहिका, डॉक्टर, रुग्णांवर हमले केले. काही माध्यमांनीही असे म्हटले आहे.

Advertisement

युक्रेनमध्ये 1,351 रशियन सैनिक मारले गेल्याची माहिती रशियाच्या लष्करी जनरल स्टाफच्या उपप्रमुखांनी शुक्रवारी दिली. कर्नल जनरल सर्गेई रुडस्कोई यांनी सांगितले की, 3,825 रशियन सैनिक जखमी झाले आहेत. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायजेशन (NATO) ने अंदाज व्यक्त केला आहे की युक्रेनमध्ये चार आठवड्यांच्या युद्धात 7,000 ते 15,000 रशियन सैनिक मारले गेले आहेत.

Advertisement

दरम्यान, युक्रेनमधील मानवतावादी संकटासाठी रशियाला जबाबदार धरणारा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेने मंजूर केला आहे. या ठरावात तात्काळ युद्धविराम आणि लाखो नागरिकांसह घरे, शाळा आणि रुग्णालये यांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. ठराव रशियाच्या आक्रमकतेच्या “गंभीर मानवतावादी परिणामांचा” निषेध करतो. या ठरावात म्हटले आहे की, गेल्या अनेक दशकांत जगाने युरोपमध्ये इतके मोठे मानवतावादी संकट पाहिले नाही.

Advertisement

युक्रेनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) मांडलेल्या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. युक्रेनचा प्रस्ताव रशियाच्या हमल्यामुळे निर्माण झालेल्या मानवतावादी संकटाबाबत होता. या प्रस्तावाच्या बाजूने 140 तर विरोधात 5 मते पडली. त्याचवेळी भारतासह 38 सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही. युक्रेनमधील मानवतावादी संकटासाठी रशियाला जबाबदार धरणारा ठराव महासभेने मंजूर केला आणि तात्काळ युद्धबंदीची मागणी केली.

Advertisement

युद्धाबाबत रशियाचा मोठा खुलासा..! दुसऱ्या टप्प्यातील प्लान केलाय उघड; पहा, काय सुरू आहे युद्धाच्या मैदानात..

Advertisement

संयु्क्त राष्ट्रांत रशिया विरोधात ‘तो’ ठराव मंजूर.. जाणून घ्या, चीन आणि भारताने काय केले..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply