Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. आता कोरोनाने चीनला केलेय हैराण.. फक्त 25 दिवसांत सापडलेत ‘इतके’ रुग्ण; जाणून घ्या, Corona Update..

मुंबई : जगातील काही देशात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. यामध्ये युरोप आणि आशियातील काही देशांचा समावेश आहे. सध्या चीनमध्ये (China) कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. अगदी कठोर उपाययोजना करुन कोरोना आटोक्यात आणल्याचा दावा करणाऱ्या चीनला कोरोनाने हैराण केले आहे. काही दिवसांपासून येथे कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. एरव्ही दोन किंवा तीन रुग्ण सापडले तरी कठोर लॉकडाऊन (Lockdown) करणाऱ्या या देशात आता 1 मार्चपासून आतापर्यंत तब्बल 56 हजार कोरोना रुग्ण (Corona Patient) सापडले आहेत. सध्या देशातील परिस्थिती आधिक गंभीर आहे, असे येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Advertisement

राष्ट्रीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे 1 मार्चपासून 56 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण उत्तर-पूर्व जिलिन प्रांतात सापडले आहेत आणि यामध्ये लक्षणे नसणारे रुग्णही आहेत.

Advertisement

जगातील अनेक देश पुन्हा एकदा कोरोनाच्या जुन्या दिवसांचा अनुभव घेत आहेत. जगभरात काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत आहेत. मॉडर्ना (Moderna) कंपनीचे सीईओ स्टीफन बैंसल यांनी म्हटले आहे, की नवीन कोविड-19 व्हेरियंट आधीच्या व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक असण्याची 20 टक्के शक्यता आहे. फ्रान्स, जर्मनी, चीन आणि इटलीसह जगातील अनेक देश संसर्गाच्या नवीन लाटेचा (New Wave) सामना करत आहे.

Loading...
Advertisement

जर्मनीमध्ये (Germany) 2,96,498 नवीन कोविड-19 प्रकरणे आल्यानंतर एकूण प्रकरणांची संख्या 1,98,93,028 झाली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, युरोपियन देशांमध्ये आतापर्यंत 1.28 लाखांहून अधिक लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारपासून आतापर्यंत 288 मृत्यूची नोंद झाली आहे. गुरुवारी, फ्रान्समध्ये (France) 1,48,635 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 112 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये (Italy) कोरोना विषाणूचे 81,811 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका दिवसाआधी 76,260 प्रकरणे नोंदण्यात आली होती.

Advertisement

अमेरिका आणि चीन कोरोनाने हैराण..! चीनमध्ये आणखी एका शहरात कठोर लॉकडाऊन; जाणून घ्या अपडेट

Advertisement
Advertisement

Leave a Reply