Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढले चीनचे टेन्शन.. रशियामुळे चीनचे असे होतेय नुकसान; जाणून घ्या..

मुंबई : रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा परिणाम चीनवरही (China) दिसून येत आहे. चीनवर एक प्रकारे सामरिक दबाव निर्माण झाला आहे. युक्रेनवर रशिया युद्ध जवळपास महिनाभरापासून सुरू आहे आणि याच दरम्यान सामरिकदृष्ट्या चीनही मित्र देशामुळे कमकुवत होताना दिसत आहे. अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे अवर सचिव कोलिन काल म्हणाले, की “मला वाटते की रशियाने पुतिनच्या (Vladimir Putin) आदेशानुसार युक्रेनवर ज्या प्रकारे हमला केला आहे ते चीनवर ओझे बनले आहे.” 6 महिन्यांआधी सारखे नव्हते. चीन सरकारने या मुद्द्यावर सातत्याने रशियाला पाठिंबा दिला आहे.

Advertisement

जागतिक पातळीवरही या मुद्द्यावर चीनने कायमच रशियाला समर्थन दिले आहे. याशिवाय रशियाच्या हमल्यासाठी चीनने निषेधही केला नाही. मात्र, याबाबत चीनमध्ये मतभेद आहेत. रशियाला अशाप्रकारे पाठिंबा दिल्याने चीनचे नुकसान होईल, असे चीनच्या काही धोरणकर्त्यांचे म्हणणे आहे. रशिया सोबतच्या आघाडीमुळे चीनच्या जगातल्या हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. युक्रेन (Ukraine) आणि तैवानची (Taiwan) तुलना केली जात आहे आणि असे म्हटले जात आहे, की रशियाकडून अनुभव घेऊन चीनही तैवानवर हमला करू शकतो.

Advertisement

अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, युक्रेनियन सैन्याने रशियन सैन्याला राजधानी कीवपासून दूर ठेवण्यात यश मिळवले आहे. आताही कीवपासून केवळ 15 मैलांवर सैन्य आहे. विशेष म्हणजे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह (United Nations Security Council) अनेक मंचांवर चीनने रशियाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. याशिवाय भारतानेही (India) मुत्सद्दी कौशल्य दाखवून एकाही बाजूने मत व्यक्त केलेले नाही. एकीकडे भारताने युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे रशियाने केलेल्या हमल्याचा निषेधही केलेला नाही.

Advertisement

दरम्यान, याआधी चीनचे उप परराष्ट्र मंत्री म्हणाले होते, की पूर्व युरोपमध्ये (Europe) नाटोने जे काही केले, त्याचा परिणाम युद्धाच्या रूपाने समोर आला आहे. आशिया-पॅसिफिक परिसरामध्ये अमेरिका (America) आता नाटोप्रमाणेच काम करत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले की, अमेरिका आपल्या विस्तारवादी धोरणात वेगाने वाढ करत आहे. त्याचे परिणाम मात्र धोकादायक असतील, अशी धमकीही चीनने यानिमित्ताने दिली होती.

Loading...
Advertisement

शिन्हुआ विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चीनचे उप परराष्ट्र मंत्र्यांनी हा आरोप नाटो संघटनेवर केला होता. ते म्हणाले होते, की सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायजेशन (नाटो) चाही वॉर्सा करारासह विलय करायला हवा होता. मात्र हे केले नाही. त्याऐवजी, नाटोचा सतत विस्तार केला गेला. त्यांच्या विस्तारवादी धोरणांमुळेच आज युक्रेनमध्ये युद्ध पेटले आहे. कारण रशियाला (Russia) आपल्या संरक्षणासाठी काही पावले उचलावी लागली, त्याचा परिणाम आज युद्धाच्या रूपाने जगासमोर आहे.

Advertisement

आता ‘NATO’ ने चीनला फटकारले..! स्पष्ट शब्दांत चीनी नेत्यांना दिलाय ‘हा’ धोक्याचा इशारा..

Advertisement

रशियाकडून किती मिळतेय कच्चे तेल ? ; केंद्र सरकारने दिलेय ‘या’ प्रश्नाचे उत्तर; वाचा, महत्वाची माहिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply