Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता ‘NATO’ ने चीनला फटकारले..! स्पष्ट शब्दांत चीनी नेत्यांना दिलाय ‘हा’ धोक्याचा इशारा..

मुंबई : एक महिन्यापासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहे. लाखो नागरिकांना दुसऱ्या देशात आश्रय घ्यावा लागत आहे. तर दुसरीकडे रशिया सुद्धा आर्थिक निर्बंधांचा सामना करत आहे. सध्या अमेरिकेसह युरोपिय देश रशियाच्या विरोधात उभे राहिले आहेत. मात्र, असेही काही देश आहेत जे रशियाला मदत करत आहेत. यामध्ये चीन आघाडीवर आहे. चीन रशियाला सुरुवातीपासूनच समर्थन देत आहे. रशियाच्या समर्थनात आणि अमेरिका, नाटोच्या विरोधात वक्तव्ये देत आहेत. या युद्धाला अमेरिका आणि नाटो संघटना जबाबदार असल्याचे चीनने अनेक वेळा म्हटले आहे.

Advertisement

त्यानंतर आता नाटो संघटनेचे सरचिटणीस स्टोलटेनबर्ग यांनी चीनच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, की चीनला आमचा संदेश हाच आहे की, उर्वरित जगाबरोबर सामील व्हा आणि रशिया विरोधात या घातक युद्धाचा निषेध करा. त्याच वेळी, ते म्हणाले की आर्थिक किंवा लष्करी समर्थनही देऊ नये.

Advertisement

अशा हमल्यांचा सामना करण्यासाठी नाटो सहकाऱ्यांनी युक्रेनला शस्त्रास्त्रे देण्याचे मान्य केले आहे, असे स्टॉल्टनबर्ग यांनी सांगितले. त्याचवेळी ते म्हणाले की, नाटोचे कारण देत रशिया युक्रेनमध्ये जैविक हमल्याची तयारी करू शकत असल्याने आम्ही काळजीत आहोत. असे घडल्यास संघर्षाचे स्वरूप बदलेल. याचा परिणाम केवळ युक्रेनच नाही तर नाटो देशांवरही होईल.

Advertisement

त्याच वेळी, नाटो शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, नाटो नेत्यांनी विशेषत: पूर्व युरोपमध्ये संरक्षण अधिक भक्कम करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. नाटो स्लोव्हाकिया, रोमानिया, बल्गेरिया, हंगेरी येथे चार नवीन लढाऊ तुकड्या तैनात करेल. बायडेन असेही म्हणाले, की नाटो नेते त्यांच्या जूनच्या शिखर परिषदेआधी अतिरिक्त सैन्य आणि क्षमतांसाठी योजना विकसित करतील.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी चीनचे उप परराष्ट्र मंत्री म्हणाले होते, की पूर्व युरोपमध्ये (Europe) नाटोने जे काही केले, त्याचा परिणाम युद्धाच्या रूपाने समोर आला आहे. आशिया-पॅसिफिक परिसरामध्ये अमेरिका (America) आता नाटोप्रमाणेच काम करत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले की, अमेरिका आपल्या विस्तारवादी धोरणात वेगाने वाढ करत आहे. त्याचे परिणाम मात्र धोकादायक असतील, अशी धमकीही चीनने यानिमित्ताने दिली होती.

Advertisement

शिन्हुआ विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चीनचे उप परराष्ट्र मंत्र्यांनी हा आरोप नाटो संघटनेवर केला होता. ते म्हणाले होते, की सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायजेशन (नाटो) चाही वॉर्सा करारासह विलय करायला हवा होता. मात्र हे केले नाही. त्याऐवजी, नाटोचा सतत विस्तार केला गेला. त्यांच्या विस्तारवादी धोरणांमुळेच आज युक्रेनमध्ये युद्ध पेटले आहे. कारण रशियाला (Russia) आपल्या संरक्षणासाठी काही पावले उचलावी लागली, त्याचा परिणाम आज युद्धाच्या रूपाने जगासमोर आहे.

Advertisement

‘त्यामुळेच’ घडलेय रशिया-युक्रेन युद्ध; चीनने केलाय खळबळजनक दावा; अमेरिकेलाही दिलीय धमकी..

Advertisement

युक्रेनचा प्लान आहे तरी काय..? ; NATO संघटनेकडे मागितलीय ‘ही’ मोठी मदत.. पहा, कसे बदलतेय राजकारण..

Advertisement
Advertisement

Leave a Reply